Oscar 2023: चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा 'ऑस्कर २०२३' नुकताच पार पडला. लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या ९५व्या ऑस्कर सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विशेष स्थान पटकावले होते. तिने ऑस्करच्या आदल्या रात्री वर्कआऊट केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.