Deepika Padukone: मुलीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण घेणार 'हा' महत्त्वाचा निर्णय? ऐकून चाहत्यांना बसेल धक्का!-deepika padukone will take this important decision after the birth of her daughter fans will be shocked to hear ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepika Padukone: मुलीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण घेणार 'हा' महत्त्वाचा निर्णय? ऐकून चाहत्यांना बसेल धक्का!

Deepika Padukone: मुलीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण घेणार 'हा' महत्त्वाचा निर्णय? ऐकून चाहत्यांना बसेल धक्का!

Sep 15, 2024 07:56 AM IST

Deepika Padukone Baby Girl: दीपिकाने ८ सप्टेंबर रोजी एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दीपवीरचे चाहते आणि स्टार्सकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh
Deepika Padukone and Ranveer Singh

Deepika Padukone Baby Girl: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. दीपिका आणि रणवीर आता अखेर आई-वडील झाले आहेत. दीपिकाने ८ सप्टेंबर रोजी एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दीपवीरचे चाहते आणि स्टार्सकडून अभिनंदन करण्यात आले. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीला अद्याप रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. दीपिकाच्या छोट्या परीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. मात्र, यासाठी चाहत्यांना आता मोठी वाट बघावी लागणार आहे. दीपिका आणि रणवीर आपल्या बाळाचा फोटो इतक्यात शेअर करणार नसल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, आता दीपिका आपल्या मुलीच्या संगोपनासाठी अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्या 'पॅरेंटिंग स्टाईल'चा अवलंब करणार असल्याचा दावा केला जात आहे.

नॅनी स्वत:शिवाय मुलीचे संगोपन करेल का दीपिका?

आजकाल असे दिसून येते की, स्टार्स आपल्या मुलांच्या संगोपनासाठी लाखो रुपये पगार देऊन एक आया ठेवतात. करीना कपूर खानपासून असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या मुलांचा सांभाळ आय करतात. पण, दीपिका पादुकोण तसे करणार नाही. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्या रायप्रमाणेच दीपिका स्वत: आपल्या मुलीची काळजी घेणार आहे. ऐश्वर्या नॅनीच्या मदतीशिवाय स्वत: मुलगी आराध्याला जसं सांभाळते, तसं दीपिका फॉलो करेल. या मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यांवर विश्वास ठेवला तर, दीपिका मुलीच्या संगोपनासाठी अभिनयातून  ही ब्रेक घेणार की काय, अशीही अटकळ बांधली जात आहे.

Rakhi Sawant: मी मावशी झाले! दीपिका-रणवीरची गुडन्यूज ऐकताच राखी सावंतने मारल्या उड्या; खेळणी घेत म्हणाली...

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह देखील रणबीर कपूर-आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा-विराट कोहली यांसारख्या आपल्या मुलीच्या फायद्यासाठी 'नो-फोटो पॉलिसी' स्वीकारू शकतात. ते त्यांच्या मुलीला मीडियापासून शक्य तितके दिवस दूर ठेवतील आणि योग्य वेळ आल्यावर जगाला तिची झलक दाखवतील.

दीपिकाकडे चित्रपटांची रंग

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटात दिसली होती. दीपिकाने गरोदरपणात या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. तर, आता ती दीपिकाच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात झळकणार आहे. रणवीर सिंह, अक्षय कुमार, अजय देवगण, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय 'सिंघम अगेन'व्यतिरिक्त रणवीर ‘डॉन ३’मध्येही दिसणार आहे.

Whats_app_banner