Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दीपिका पदुकोण दिसणार नाही? नेमकं सत्य काय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दीपिका पदुकोण दिसणार नाही? नेमकं सत्य काय?

Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दीपिका पदुकोण दिसणार नाही? नेमकं सत्य काय?

Published Jul 11, 2024 08:53 PM IST

Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, दीपिका पदुकोण या चित्रपटात दिसणार नसल्याचे बोलले जात आहे.

Kalki 2898 AD
Kalki 2898 AD

Kalki 2898 AD: नुकताच बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, दीपिका पदुकोण या चित्रपटात दिसणार नसल्याचे बोलले जात आहे. दिग्दर्शक नाग अश्विनच्या ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या यशानंतर चाहत्यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची ही जोरदार चर्चा सुरू केली आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांना माहित आहे की चित्रपटाचा शेवट एका मनोरंजक वळणावर होतो.

या चित्रपटाच्या शेवटी दीपिका पदुकोण प्रेग्नंट दाखवण्यात आली आहे, ज्यावरून दीपिका भाग २मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र, या चित्रपटाच्या भाग २मध्ये दीपिकाला रिप्लेस केले जाऊ शकते, असा दावा करणारी एक बातमी समोर आली आहे.

Bigg Boss OTT 3: ‘माझ्या नवऱ्याला आणि त्याच्या बायकोला बाहेर काढा’; पायल मलिक वैतागली!! नक्की झालं काय?

कल्कीच्या पार्ट २ मध्ये दिसणार नाही दीपिका?

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका पदुकोण ही ‘कल्की २८९८ एडी’च्या दुसऱ्या भागात दिसणार होती. या आधी एका सूत्राने बॉलिवूड हंगामाला सांगितले होते की, चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन दीपिकाच्या मॅटर्निटी ब्रेकची वाट पाहण्यास तयार आहेत. मात्र, ‘कल्की २८९८ एडी’चे यश आणि त्याच्या सिक्वेलची मागणी पाहता निर्माते भाग २मध्ये दीपिकाची जागा दुसरी एखादी अभिनेत्री घेऊ शकते.

चित्रपटाच्या यशानंतर एका मॅगझिनशी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी सांगितले होते की, ‘कल्की २८९८ एडी’च्या भाग २चे २५ ते ३० दिवस शूट झाले आहे आणि अजून बरेच शूटिंग बाकी आहे.

‘कल्की २८९८ एडी’ ठरला हिट!

तर, या चित्रपटाविषयी माहिती देताना नाग अश्विन म्हणाला होता की, दुसऱ्या भागात कमल हसन आणि अमिताभ बच्चन यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. ‘कल्की २८९८ एडी’च्या भाग २ बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. ‘कल्की २८९८ एडी’ हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Whats_app_banner