बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने एका मुलीला जन्म दिला. तिने मुलीचे नाव दुआ ठेवले. त्यानंतर दीपिकाने फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. आता दीपिका रॅम्प वॉक करताना दिसली. त्याचा वॉक पाहून चाहते आनंदी झाले आहेत. अनेकांनी तर दीपिकाची तुलना सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्याशी केली आहे.
बॉलिवूड फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या ब्रँडला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मुंबईत एक खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये अनेक अभिनेत्रींने रॅम्प वॉक केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दीपिकाचे रॅम्पवॉक करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या इव्हेंटसाठी दीपिकाने लूज क्रीम शर्ट, मॅचिंग ट्राऊझर आणि ट्रेंच कोट परिधान केला होता. तिने स्टनिंग स्टेटमेंट ज्वेलरीसह आपला लूक पूर्ण केला. तिने केसांचा पोनी घातला आहे आणि चष्मा लावला आहे.
सोशल मीडियावर दीपिकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने, "डीपीला नुकतेच एक बाळ झाले आहे आणि तिने राणीप्रमाणे आपले नवीन शरीर आणि नवीन भूमिका स्वीकारली आहे" अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'रेखाजींचा वारसा पुढे नेणारी खरी राणी' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने दीपिका आहे की रेखा? मला वाटलं ती रेखा आहे" अशी कमेंट केली आहे.
सोनम कपूर, आलिया भट्ट, अदिती राव हैदरी, अनन्या पांडे, सिद्धार्थ, शबाना आझमी, सोभिता धुलिपाला, बिपाशा बसू यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. सब्यसाचीने आपल्या ब्रँडला २५ वर्षे पूर्ण होत असताना रेड कार्पेटवर हजेरी लावली.
वाचा: महाकुंभ मेळ्यामधील व्हायरल झालेल्या मोनालिसाचे नशीब फळफळलं, सिनेमामध्ये करणार काम?
दीपिकाच्या नुकत्याच आलेल्या चित्रपटाबद्दल तर ती रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या पोलिस ड्रामामध्ये शेवटची दिसली होती. या चित्रपटात दीपिकाने शक्ती शेट्टी म्हणजेच लेडी सिंघमची भूमिका साकारली होती. या चित्रपटात रणवीर सिंग, अजय देवगण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, करिना कपूर, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दीपिकाने अद्याप तिच्या पुढच्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.
संबंधित बातम्या