Deepika Padukone Trolled: पैशांसाठी काहीही... अंबानींच्या लग्नात प्रेग्नंट दीपिकाला नाचताना पाहून चाहते संतापले!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepika Padukone Trolled: पैशांसाठी काहीही... अंबानींच्या लग्नात प्रेग्नंट दीपिकाला नाचताना पाहून चाहते संतापले!

Deepika Padukone Trolled: पैशांसाठी काहीही... अंबानींच्या लग्नात प्रेग्नंट दीपिकाला नाचताना पाहून चाहते संतापले!

Mar 03, 2024 12:31 PM IST

Deepika Padukone Trolled For Dancing In Pregnancy: दीपिका पादुकोण हिचा डान्स व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते चांगलेच संतापले आहेत.

Deepika Padukone Trolled
Deepika Padukone Trolled

Deepika Padukone Trolled For Dancing In Pregnancy: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्न बंधनात अडकला आहे. अनंत लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे. जामनगरमध्ये सध्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. अंबानींच्या या फंक्शनमध्ये बॉलिवूडचे सगळे कलाकार परफॉर्म करताना दिसत आहेत. याच सोहळ्यात बी-टाऊनचे पॉवर कपल म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनीही प्री-वेडिंगमध्ये आपल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, आता दीपिका पादुकोण हिचा डान्स व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते चांगलेच संतापले आहेत. आता नेटकरी दीपिका पादुकोण हिला जोरदार ट्रोल करत आहेत.

दीपिका पादुकोण हिने नुकतीच आपली गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अनंत अंबानीच्या लग्नाआधीच दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. दीपिकाने सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा करत, आपण आई होणार असल्याचे आणि या वर्षी सप्टेंबरमध्ये आपल्या बाळाचा जन्म होणार असल्याचे म्हटले होते. या घोषणेनंतर 'मॉम टू बी' दीपिका आणि रणवीर सिंह जामनगरमध्ये राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी मंचावर डान्स देखील केला. दीपिका आणि रणवीर यांनी 'दिल धडकने दो' या चित्रपटातील 'गल्लां गुडियाँ...' या गाण्यावर नृत्य सादर केले.

Viral Video: अंबानींच्या लग्नात शाहरुख खानने लगावला ‘जय श्रीराम’चा नारा! व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

नेटकऱ्यांनी दीपिकाला फटकारलं!

या डान्सदरम्यान दीपिका पादुकोणही रणवीरच्या सिग्नेचर स्टेप्स फॉलो करताना दिसली. दोघांनीही आपल्या डान्सने सगळ्यांचे मनोरंजन केले. आता त्यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचा यांचा हा डान्स अनेक यूजर्सना आवडला आहे. मात्र, 'मॉम टू बी'दीपिकाने गरोदरपणात असा डान्स करणे अनेक चाहत्यांना आवडलेले नाही. या प्रकरणी सोशल मीडियावर नेटकरी तिला फटकारत आहेत.

कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘ही बाई दोन महिन्यांची गरोदर आहे ना?' आणखी एकाने लिहिले की, 'पैशासाठी ही लोकं आपल्या तब्येतीचीही काळजी घेत नाहीत.’ ‘पैशाची कमतरता नाही, तरीही गरोदरपणात एवढी समज असायला हवी होती न?’ असे एकाने म्हटले आहे. 'पैसा माणसाला काय काय करायला लावतो?' अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत.

Whats_app_banner