Deepika Padukone Maternity Photoshoot: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचे पहिलेवहिले प्रेग्नन्सी फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीने तिचे हे सुंदर फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दीपिका-रणवीरने या फोटोशूटचे काही फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. रणवीर आणि दीपिकाचे हे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या बाळाच्या स्वागतासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या फोटोशूटमधून दीपिकाने तिचा बेबी बंप खोटा आहे, असं म्हणणाऱ्या लोकांना चपराक लगावली आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण आता लवकरच आई बाबा बनणार आहे. आता त्यांनी त्यांच्या प्रेग्नेंन्सी फोटोशूटद्वारे सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. दीपिका आणि रणवीरच्या सुंदर फोटोंनी त्यांच्या चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. त्यांचे हे फोटोशूट इंटरनेटवर चर्चेत आले आहे. त्यांच्या या फोटोंनी सोशल मीडियावर येताच एकच खळबळ उडाली आहे. फोटोशूटमधील हे फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या या फोटोंनी चाहत्यांना कपल गोल्स दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या बेबी बंपची बरीच चर्चा होती. अभिनेत्रीचा बेबी बंप खोटा असल्याचे बोलले जात होते. या अफवांच्या दरम्यान, रणवीर आणि दीपिकाच्या या फोटोशूटने त्या सर्व बातम्यांचे खंडन केले आहे, ज्यात असे म्हटले जात होते की, कुणालाही दीपिकाचा बेबी बंप व्यवस्थित पाहता आलेला नाही.
दीपिका पदुकोणच्या प्रेग्नेन्सी फोटोशूटमध्ये तिचे सौंदर्य आणि तिच्या गरोदरपणाची खास चमक स्पष्टपणे दिसून येते. दीपिकाने हा खास क्षण एक नवीन फॅशन ट्रेंड म्हणून शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्टायलिश आणि ग्रेसफुल दिसत आहे. तर, बाबा होणार असल्याचा आनंद रणवीर सिंहच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या डोळ्यात उत्सुकता आणि आनंदाची चमक दिसत आहे. बाळाच्या आगमनाच्या बातमीने या जोडप्यामधील प्रेम आणखी घट्ट झाले आहे.
या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. रणवीर आणि दीपिकाच्या बाळाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत. याच महिन्याच्या शेवटी दीपिका बाळाला जन्म देऊ शकते, असे म्हटले जात आहे. एकीकडे हे जोडपं या नव्या अध्यायाची सुरुवात करत असताना, आता त्यांच्या फोटोशूटवर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.