अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकताच तिच्या ब्युटी ब्रँड ८२°ईसाठी आयोजित एका कार्यक्रमात परिधान केलेला पिवळा गाऊन ३४,००० रुपयांना विकला आहे. त्यातून मिळणारी रक्कम धर्मादाय संस्थेला देण्यात येणार आहे. काही तासांपूर्वी दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर गाऊन विकल्याची घोषणा केली आणि काही मिनिटांतच तो विकला गेल्याचेही तिने यात म्हटले आहे.
लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने रिलमध्ये पिवळ्या रंगाच्या गाऊनमधील फोटो शेअर करत लिहिले, "फ्रेश ऑफ द रॅक! यावर कोणाचा हात आहे!? नेहमीप्रमाणेच @tlllfoundation उपक्रमांना ही रक्कम मदत करेल. व्हेरिफाइड हेल्पलाईन संसाधनांच्या यादीसाठी www.thelivelovelaughfoundation.org/find-help/helplines भेट द्या.' चॅरिटीसाठी 'फ्रेश ऑफ द रॅक' उपक्रमांतर्गत कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर अवघ्या ७२ तासांनी हा गाऊन विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.
दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर रील शेअर करत तिच्या 'क्लॉसेट'ची लिंक शेअर केली आहे, ज्यात या ड्रेसची किंमत दाखवण्यात आली आहे. काही मिनिटांतच 'एम्पायर कट कॉटन मिडी विथ अ ड्रामॅटिक फ्लेअर' असे वर्णन असलेला तिचा हा डिझायनर एम्पायर ड्रेस ३४ हजार रुपयांना विकला गेला आहे. त्यानंतर काही मिनिटांनी तिने हा गाउन विकत घेणाऱ्याला टॅग करत 'सेल आऊट' लिहिलेला फोटो शेअर केला होता. दीपिकाचा प्रेग्नन्सी ग्लो दाखवणारा हा गाऊन २० मिनिटांच्या आत विकला गेल्याचा दावा तिच्या टीमने केला आहे. नुकताच दीपिकाने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये या कार्यक्रमातील एक रील शेअर करत 'मी माझ्या सनशाइन स्टेट'मध्ये असल्याचे लिहिले होते.
केवळ चाहतेच नव्हे तर, रणवीर सिंहदेखील दीपिका पदुकोणच्या या ड्रेसमधील लूकवर भाळला होता. पत्नी दीपिका पदुकोणचे सौंदर्य पाहून तो इतका भारावून गेला की, त्याने तिच्या या लूकवर कमेंट करत ट्रोलर्सना चांगलेच टोमणे हाणले. कार्यक्रमाच्या दिवशी त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दीपिकाचे फोटो शेअर केले होते. रणवीर सिंहच्या पहिल्याच फोटोत दीपिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. याला कॅप्शन देताना त्याने लिहिले की 'माझा सूर्यप्रकाश!' दीपिकाच्या पुढील फोटोत रणवीरने कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘उफ्फ! काय करू मी? काय झालं मला?’. तर, शेवटच्या फोटोत रणवीरने लिहिले की, ‘बुरी नजर वाले, तेरा मुँह काला’.
संबंधित बातम्या