मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: बेशरम रंग गाण्यावर दीपिकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'डान्स करताना आम्ही...'
बेशरम रंग
बेशरम रंग (HT)

Pathaan: बेशरम रंग गाण्यावर दीपिकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'डान्स करताना आम्ही...'

24 January 2023, 11:24 ISTAarti Vilas Borade

Deepika Padukone: दीपिका पादूकोण आणि शाहरुख खान महत्त्वाच्या भूमिकेत असणारा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी दीपिकाने या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे

'पठाण' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादूकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गाण्यात दीपिकाचा सिझलिंग लूक पाहण्यासारखा आहे. तसेच दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीने तर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आता दीपिकाने या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यशराज फिल्मने दीपिका पादूकोणचा पठाण चित्रपटाशी संबंधीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो मुलाखत देत असल्याचे दिसत आहे. या मुलाखतीमध्ये त्याला चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आला होता. ‘बेशरम रंग’ व ‘झुमे जो पठाण’ या पठाण चित्रपटातील गाण्यांपैकी तुझे आवडते गाणे कोणते? असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला होता.
वाचा: काय? 'पठाण'चं तिकिट २४०० रुपये, तरीही रिलिज आधी हाऊसफुल

दीपिकाने उत्तर देत, “दोन्ही गाणी माझी आवडती आहेत. त्यामुळे हे सांगणे फार कठीण आहे. दोन्हीही गाणी वेगळी आहेत. पण ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी मला जास्त मेहनत घ्यावी लागली. हे एक प्रकारचे माझे सोलो गाणच होते. ज्या ठिकाणी हे गाणे शूट करण्यात आले, तेथे शूट करताना अडथळे येत होते. प्रचंड मेहनत घ्यावी लागली. कारण, तिथे वारा सुटल्यामुळे फार थंडी वाजत होती.”

पुढे दीपिका म्हणाली, “या गाण्याचे शूट करताना मी मजा केली. त्यात शाहरुख सोबत होता. डान्स करताना आम्ही स्टेप्सचा फार टेक्निकली विचार केलेला नाही. आम्ही फक्त स्टेप्स समजून घेतल्या व त्या करताना त्याचा आनंद घेतला. त्यामुळेच दोन्हीही गाणी हिट ठरली.”

विभाग