उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा १२ जुलै रोजी लग्नसोहळा झाला. या व्हीव्हीआयपी लग्नाला देश-विदेशातील सर्व बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या स्टार्ससोबतच अनेक बिझनेसमन, राजकारणी आणि क्रीडा जगतातील अनेक नामवंत व्यक्तींनी आपल्या उपस्थितीने हा विवाह संस्मरणीय बनवला. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमधील अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोणची जोरदार चर्चा रंगली आहे.
अनंत-राधिकाचे लग्न आणि लग्नानंतरच्या समारंभाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अशातच आता इंटरनेटवर एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी दिसत आहेत. धोनीला पाहताच राधिका त्याला मिठी मारते. त्याचवेळी अनंत आणि साक्षी जवळच उभे राहून त्यांना पाहत होते. पण या फोटोत या चौघांच्या मागे उभ्या असलेल्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगसोबत असे काही घडले, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
महेंद्रसिंग धोनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगदेखील कैद झाले आहेत. फोटो नीट पाहिला तर दोघांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव काहीसे वेगळे आहेत. हा फोटो पाहून दीपिका रणवीरवर कशावरून रागावल्याचे दिसत आहे. मात्र, त्यांच्यात नेमकं काय चाललंय हे कुणालाच माहित नसले तरी या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
महेंद्रसिंह धोनी आणि राधिका मर्चंटच्या या फोटोवर चाहत्यांना मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत, त्यांच्यापेक्षा चाहते दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगबद्दल कमेंट करताना दिसत आहेत. अनेक इंटरनेट युजर्स मजेशीर पद्धतीने कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने 'दीपिका रणवीरला म्हणतेय की दुसऱ्या मुलींकडे पाहू नकोस' अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने 'दीपिका रणवीरला सांगत आहे की तू घरी चल , इथे खूप डान्स केला आहेस' अशी मजेशीर कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने दीपिका रणवीरला का ओरडत आहे? असा प्रश्न विचारला आहे.
संबंधित बातम्या