मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepika Padukone Pregnant : कुणी तरी येणार येणार गं... दीपिका पादुकोण-रणवीर सिंहने शेअर केली गुडन्यूज!

Deepika Padukone Pregnant : कुणी तरी येणार येणार गं... दीपिका पादुकोण-रणवीर सिंहने शेअर केली गुडन्यूज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 29, 2024 11:11 AM IST

Deepika Padukone Pregnant:अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Deepika Padukone and ranveer singh
Deepika Padukone and ranveer singh

Deepika Padukone Preganant: बॉलिवूडमधून आता आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. बॉलिवूड अभिनेत्रीदीपिका पादुकोण आई होणार असून, ती सप्टेंबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अभिनेत्रीच्या गरोदर असल्याच्या बातम्या येत होत्या आणि आता तिने याला दुजोरा दिला आहे. दीपिकाने ही आनंदाची बातमी शेअर करताच तिच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बाळाच्या आगमनाच्या तारखेची माहिती दिली आहे. आपण आई होणार असल्याची घोषणा करताना दीपिका पादुकोण हिने लिहिले की, ‘सप्टेंबर २०२४ – दीपिका आणि रणवीर’. दीपिकाच्या या पोस्टला काही मिनिटांतच लाखो व्ह्यूज मिळाले असून, यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सेलेब्सही त्यांचे भरभरून अभिनंदन करत आहेत.

‘बाफ्टा’पासून रंगली चर्चा!

लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरात चिमुकलं बाळ येणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण हिने बाफ्टा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. तेव्हापासून तिचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. बाफ्टा अवॉर्ड शो दरम्यान देखील अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा बेबी बंप दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी यावर चुप्पी साधली होती. अखेर आज त्यांनी आपली ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दीपिका आणि रणवीर ही जोडी आई-बाबा होणार असल्याचे कळताच आता चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.

चित्रपटाच्या सेटवर जमली जोडी

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांची प्रेमकहाणी 'रामलीला' चित्रपटाच्या सेटवरच सुरू झाली होती. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. बॉलिवूडची लोकप्रिय जोडी गुडन्यूज कधी देणार याची चाहत्यांना देखील उत्सुकता होती. एकीकडे दोघेही आपापल्या कामात प्रचंड व्यस्त आहेत. दीपिका लवकरच साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर, रणवीर सिंह 'सिंघम ३' आणि 'डॉन ३' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

IPL_Entry_Point