Deepika Padukone Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या या टप्प्याचा आनंद घेत आहे. अभिनेत्री लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिकाचे पहिले अपत्य मुलगा होणार की, मुलगी हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. मात्र, दीपिकाच्या प्रसूतीपूर्वीच अभिनेत्रीला मुलगा होणार असल्याचे बोलले जात आहे. हे स्वतः अभिनेत्रीचे कुटुंब म्हणत आहे.
दीपिका आणि रणवीरने फेब्रुवारी २०२४मध्ये ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून या गुड न्यूजबद्दल चाहत्यांमध्ये वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. मात्र, झूमवरील वृत्तानुसार, दीपिकाचं हे पहिलं बाळ हे 'मुलगा' असेल, असा अंदाज कुटुंबीयांनी वर्तवला आहे. दीपिकाच्या सासू-सासऱ्यांनी यावर बोलताना म्हटले की, मातृत्वाच्या या टप्प्यावर त्यांच्या सुनेच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आहे, ज्यामुळे दीपिकाला मुलगा होईल असे वाटत आहे. शिवाय दीपिकाच्या बहिणीलाही हेच वाटत आहे. मात्र, या सगळ्या गोष्टी केवळ गंमत आहेत. या सर्व गोष्टी मनोरंजनासाठी आहेत. दीपिका आणि रणवीर मुलाचे आई-वडील होणार की, मुलीचे हे येणारा काळच सांगेल.
यासोबतच अभिनेत्रीच्या डिलिव्हरीबद्दल बोलायचे झाले तर, या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने खुलासा केला आहे की दीपिका २८ सप्टेंबर २०२४ रोजी तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका दक्षिण मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात तिच्या पहिल्या बाळाला जन्म देऊ शकते. मात्र, सध्या अभिनेत्री ब्रेकवर असून एन्जॉय करत आहे.
नुकतेच दीपिकाच्या सासूनेही लवकरच येणाऱ्या बाळाबद्दल आनंद व्यक्त केला होता आणि सर्वांचे आभारही मानले होते. दीपिका आणि रणवीर देखील त्यांच्या अपत्याबद्दल खूप उत्सुक आहेत. तसेच, मुलाच्या जन्मानंतर, जोडपे ११० कोटी रुपयांच्या नवीन घरात शिफ्ट होऊ शकतात. विशेष म्हणजे, सध्या दीपिका तिच्या कामापासून दूर आहे. मात्र, बाळाच्या जन्मानंतर दीपिका ब्रेकवर जाणार असल्याचे बोलले जात आहे. दीपिकाला तिच्या बाळाला पूर्ण वेळ द्यायचा आहे आणि त्यामुळे ती प्रसूतीनंतर लगेच कामावर परतणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री काही महिने तिच्या बाळाची काळजी घेईल आणि पुढच्या वर्षीच कामावर परत येईल. प्रसूती रजेनंतर दीपिका अमिताभ बच्चन, कमल हासन आणि प्रभाससोबत कल्कीच्या सिक्वेलच्या शूटिंगमध्ये व्यस्त होईल.