Deepika Padukone On Motherhood: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह ही जोडी बॉलिवूडची पॉवर कपल मानली जाते. चाहत्यांना देखील ही जोडी खूप आवडते. नोव्हेंबर २०१८मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. आता त्यांच्या लग्नाला पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. चाहते आता दीपिका आणि रणबीर यांच्याकडे गुडन्यूज येण्याची वाट बघत आहेत. आता या जोडीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. दीपिकाने आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, ती आता पती रणवीर सिंहसोबत फॅमिली प्लान करत आहे.
वोग सिंगापूरला दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका पदुकोण म्हणाली की, 'रणवीर आणि मला मुले खूप आवडतात. आम्ही आमचे कुटुंब सुरू करण्यासाठी आता खूप आतुर आहोत आणि तो दिवस कधी येईल याची वाट बघत आहोत.’ पुढे दीपिका म्हणाली की, ‘मी ज्या लोकांसोबत मोठी झाली आहे, असे माझे काका, काकू, कौटुंबिक मित्रांना या जेव्हा मी भेटते, तेव्हा ते मला सतत सांगतात की, मी अजूनही कशी बदलली नाही. याशिवाय ते माझ्या संगोपनाबद्दल देखील बरेच काही सांगतात. तेव्हा खूप भारी वाटतं.’
दीपिका पुढे म्हणाली, ‘या इंडस्ट्रीत प्रसिद्धी आणि पैसा यांच्या जोरावर आपला प्रभाव पाडणे सोपे आहे. पण घरी कोणीही मला सेलिब्रिटीप्रमाणे वागवत नाही. मी सगळ्यात आधी एक मुलगी आणि बहीण आहे. मला हे समीकरण बदलायचे नाही. माझे कुटुंब मला नेहमी जमिनीवर पाय रोवून उभी राहण्याची प्रेरणा देतं ठेवते. रणवीर आणि मला आशा आहे की, हीच मूल्ये आमच्या मुलांपर्यंत पोहोचतील.’
दीपिका पदुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, २०२३ हे वर्ष तिच्यासाठी खूप खास ठरलं होतं. गेल्या वर्षात ती 'पठान' या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत झळकली होती. तर, दीपिकाने शाहरुख खानच्या 'जवान'मध्येही खास कॅमिओ केला होता. आता तिचा ‘फायटर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
संबंधित बातम्या