Oscar 2023: ऑस्कर सोहळ्यात दीपिका पादूकोणला ओळखण्यात झाली मोठी चूक
Deepika Padukone: ऑस्कर सोहळ्यामध्ये दीपिका एक मॉडेल असल्याचे अनेकांना वाटले होते. त्यावर दीपिकाच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'ऑस्कर.' जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात. ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळ्याला नुकताच सुरुवात झाली आहे. लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या ९५व्या ऑस्कर सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विशेष स्थान पटकावले होते. मात्र, काही इंटरनॅशनल एजंसीजचे दीपिकाला ओळखण्यास चूक केली.
ट्रेंडिंग न्यूज
काही विदेशी मीडिया एजंसीजने दीपिकाला ब्राजीलियन मॉडेल आणि डिझायनर कॅमिया अल्वेस समजले होते. कॅमिया हॉलिवूड अभिनेता मॅथ्यूची पत्नी असल्याचे म्हटले. या मीडियाचे स्क्रीनशॉट जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा दीपिकाच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला. या स्क्रीनशॉटमध्ये दीपिकाचा फोटो ब्राजिलियन मॉडेल आणि डिझायनर कॅमिया अल्वेसच्या नावाने शेअर करण्यात आला होता. यावर दीपिकानेही नाराजी व्यक्त केली होती.
वाचा: ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘पठाण’, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार
ऑस्कर प्रेझेंटर्स दीपिका पादूकोणची निवड करण्यात आली होती. दीपिकासोबत रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, जेनिफर कॉनेली, एरियाना डीबोस, सॅमुअल एल जॅक्सन, ड्वेन जॉनसन, माइकल बी जॉर्डन, ट्रॉय कोत्सुर, जोनाथन मेजर्स, मेलिसा मॅक्कार्थी, जेनेल मोनाए, क्वेस्टलव, जो सलदाना आणि डोनी येन हे प्रेझेंटर्स दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून दिसणार असल्याची माहिती दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.