मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepika In Flight: बिझनेस क्लासचं तिकीट काढून दीपिका इकॉनॉमी क्लासमध्ये; वॉशरूमही वापरले!

Deepika In Flight: बिझनेस क्लासचं तिकीट काढून दीपिका इकॉनॉमी क्लासमध्ये; वॉशरूमही वापरले!

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 17, 2023 02:50 PM IST

Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादूकोणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानातील इकॉनमी क्लासमधील वॉशरुम वापरताना दिसत आहे.

दीपिका पादूकोण
दीपिका पादूकोण (HT)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या सिझलिंग लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच तिची आणि शाहरुखची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळचा घातला आहे. दरम्यान, दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानातून प्रवास करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपिका ही विमानतून प्रवास करत असते. तिचे बिझनेस क्लासचे तिकिट असते. मात्र ती वॉशरुम वापरण्यासाठी बिझनेस क्लासमध्ये आली आहे. सर्वसामान्यांमध्ये दीपिकाला पाहून सर्वजण खूश झाले आहेत.

दरम्यान दीपिकाने भगव्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. तसेच चेहरा ओळखू येऊ नये म्हणून तिने भगव्या रंगाची टोपी देखील घातली आहे. मात्र अनेकांना ती दीपिका असल्याचे कळाले आहे. सर्वजण तिला वाकून वाकून पाहात आहेत.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

WhatsApp channel

विभाग