Deepika Padukone : दिलजीत दोसांजच्या कॉन्सर्टमध्ये नाचली दीपिका पादुकोण! आई झाल्यानंतर 'अशी' दिसतेय अभिनेत्री
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepika Padukone : दिलजीत दोसांजच्या कॉन्सर्टमध्ये नाचली दीपिका पादुकोण! आई झाल्यानंतर 'अशी' दिसतेय अभिनेत्री

Deepika Padukone : दिलजीत दोसांजच्या कॉन्सर्टमध्ये नाचली दीपिका पादुकोण! आई झाल्यानंतर 'अशी' दिसतेय अभिनेत्री

Dec 07, 2024 10:08 AM IST

Deepika Padukone At Concert : दीपिका पदुकोण शुक्रवारी बंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. दिलजीतच्या परफॉर्मन्सचा ती चाहत्यांसोबत आनंद घेताना दिसली.

Deepika Padukone At Diljit Dosanjh Concert
Deepika Padukone At Diljit Dosanjh Concert

Deepika Padukone At Diljit Dosanjh Concert : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आपल्या मुलीच्या जन्मापासून सगळ्या कामातून ब्रेक घेतला आहे. याच ब्रेकदरम्यान दीपिकाने शुक्रवारी बेंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. यावेळी दिलजीतने दीपिकाच्या ब्रँडची जाहिरात तर, केलीच पण दोघेही स्टेजवर एकत्र परफॉर्म करताना दिसले. दिलजीतने त्याचे लोकप्रिय ‘लव्हर’ हे गाणे गायले आणि दीपिका यावर थिरकताना दिसली.

दिलजीतने केली दीपिकाच्या ब्रँडची जाहिरात

दिलजीतने त्याच्या या म्युझिक कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणच्या ब्युटी ब्रँडची जाहिरात केली. त्याने आधी दीपिकाच्या ब्रँडचं प्रॉडक्ट हातात घेतलं आणि चाहत्यांना विचारतो की, 'हे कुणाचं आहे, कुणाला माहीत का? मग, सगळे दीपिकाचं नाव घेतात. यानंतर दिलजीत म्हणतो की, मी यानेच आंघोळ करतो, यानेच चेहरा धुतो. हेच माझ्या सौंदर्याचे रहस्य आहे.  त्यानंतर तो स्टेजच्या मागे बसलेल्या दीपिकाला हसत स्टेजवर बोलवतो.

दिलजीतने दीपिकाचे कौतुक केले

एका व्हिडिओमध्ये दीपिका आणि दिलजीत 'लवर' गाण्यावर एकत्र नाचताना दिसत आहेत, तर गायकाने त्यांच्यासोबत 'हस हस' गाणेही गायले आहे. आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दीपिका त्याला काही कन्नड ओळी शिकवताना दिसत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या आहेत. पुढे, दिलजीत या अभिनेत्रीचे कौतुक करतो आणि म्हणतो, ‘तुमचा विश्वास बसेल का मित्रांनो, आपण मोठ्या पडद्यावर पाहिलेली सर्वात सुंदर अभिनेत्री आज आपल्यामध्ये आहे. स्वत:च्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, आम्हा सर्वांना अभिमान आहे.’

दिलजीतने या क्षणाचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, 'क्वीन दीपिका पादुकोण, बेंगळुरूमध्ये दिलुमिनाटी टूर. यावर दीपिका म्हणाली की, 'या आठवणींसाठी धन्यवाद.'

दीपिका शेवटची नाग अश्विनच्या ‘कल्की २८९८ एडी’मध्ये प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्यासोबत दिसली होती. चित्रपटात, तिने ‘SU-M८०’ नावाच्या गर्भवती महिलेची भूमिका केली होती, जी कॉम्प्लेक्सचा नेता सुप्रीम यास्किनपासून वाचण्यासाठी प्रयोगशाळेतून पळून जाते. या सायन्स फिक्शन चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्येही तिने शक्ती शेट्टीची भूमिका साकारली आहे. या वर्षी ८ सप्टेंबर रोजी अभिनेत्री आणि रणवीर सिंहने त्यांची मुलगी दुआचे स्वागत केले. मुलीच्या जन्मापासून ती ब्रेकवर गेली आहे.

Whats_app_banner