'९० तास काम करा, बायकोचं तोंड किती वेळ बघणार' म्हणणाऱ्या एल अँड टीच्या चेअरमनना दीपिकानं झापलं!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  '९० तास काम करा, बायकोचं तोंड किती वेळ बघणार' म्हणणाऱ्या एल अँड टीच्या चेअरमनना दीपिकानं झापलं!

'९० तास काम करा, बायकोचं तोंड किती वेळ बघणार' म्हणणाऱ्या एल अँड टीच्या चेअरमनना दीपिकानं झापलं!

Jan 10, 2025 10:45 AM IST

Deepika Padukone Reaction : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने एल अँड टीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एसएन सुब्रमण्यम यांच्यावर निशाणा साधला आहे.

दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोण

Deepika Padukone Reacted On L&T Chairman Statement : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने एल अँड टीचे चेअरमन एसएन सुब्रमण्यम यांच्यावर सडकून टीका केली आहे. एल अँड टीचे चेअरमन एसएन सुब्रमण्यम यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं आहे. ‘कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील ९० तास काम करावे. केवळ आठवड्याच्या दिवशीच नव्हे, तर रविवारीही कामावर यावे’, असे त्यांनी म्हटले होते. अशातच दीपिकाने सोशल मीडियावर एसएन सुब्रमण्यम यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

रेडिटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सुब्रमण्यम आपल्या कर्मचाऱ्यांकडून अधिक काम केले जात नसल्याची खंत व्यक्त करताना दिसले होते. एल अँड टीचे चेअरमन एसएन सुब्रमण्यम म्हणाले की, ‘मला माफ करा, मी तुम्हाला रविवारी कामावर बोलवू शकत नाही. जर मी तुम्हाला रविवारी कामावर बोलवू शकलो, तर मला अधिक आनंद होईल. कारण, मी स्वत: रविवारी काम करतो. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ बघणार आहात? तुमची बायको किती वेळ तुमच्याकडे बघत बसेल? चला, ऑफिसला या आणि कामाला लागा.’

दीपिका संतापली!

एल अँड टीच्या अध्यक्षांच्या या व्यक्तव्यावर दीपिकाने जोरदार टीका केली आहे. पत्रकार फैज डिसूझा यांची पोस्ट आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करत दीपिका पदुकोणने लिहिले की, ‘उच्च पदावर बसलेल्या लोकांच्या तोंडून असे विधान ऐकणे धक्कादायक आहे. मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे.’

Deepika Post
Deepika Post

एसएन सुब्रमण्यन यांच्या या विधानामुळे केवळ सोशल मीडिया यूजर्सच नाही तर सेलिब्रिटींनीही त्यांना फटकारले आहे. अनेकांनी आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर लिहिले की, 'इतक्या वरिष्ठ पदांवर असलेले लोक अशी विधाने करताना पाहून धक्का बसतो'. या विधानासह दीपिकाने #mentalhealthmatters टॅग देखील केला आहे.

घरी राहून बायकोचे तोंड किती वेळ बघणार? रविवारीही ड्युटी करा! उद्योगपती सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यामुळे वाद

या वक्तव्यामुळे एसएन सुब्रमण्यन यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. एल अँड टी चेअरमन म्हणाले होते की, ‘चीन अशाच पद्धतीणे काम करून अमेरिकेला मागे टाकत आहे. चीनी लोक आठवड्यातून ९० तास काम करतात, तर अमेरिकन आठवड्यात फक्त ५० तास काम करतात.’

कोण आहेत एसएन सुब्रमण्यम?

एल अँड टी ही बांधकाम कंपनी आहे. एस. एन. सुब्रमण्यम हे एल अँड टीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. एल अँड टी वेबसाइटनुसार, एसएन सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने स्टॅच्यू ऑफ युनिटी, अटल सेतू, अयोध्या राम मंदिर असे अनेक यशस्वी प्रकल्प पूर्ण केले आहेत.

Whats_app_banner