Deepika Padukone Ranveer Singh New House: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच आई बनली आहे. दीपिकाने ८ सप्टेंबरला आपल्या गोंडस लेकीला जन्म दिला आहे. शिवाय दीपिकाला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही मिळाला आहे. आई बनल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दीपिकाने नवीन घर खरेदी केले आहे. हे घर अभिनेत्रीची सासू अंजू भवनानी यांच्या घरापासून जवळ आहे. या घरात दीपिकाची सासू, सासरे जगजीत सिंग भवनानी आणि वहिनी रितिका राहतात.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, दीपिकाने हे घर सागर रेशम कॉर्पोरेट हाउसिंग सोसायटीमध्ये खरेदी केलं आहे. या सोसायटीमध्ये ४ आणि ५ BHK अपार्टमेंट आहेत. दीपिकाचा फ्लॅट १५ व्या मजल्यावर आहे. रिपोर्ट्सनुसार या आलिशान अपार्टमेंटची किंमत १७.७३ कोटी रुपये आहे. तर दीपिकाने १.०७ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. दीपिकाने नोंदणीसाठी ३०,००० रुपये दिले आहेत. अपार्टमेंटमध्ये कार पार्किंगची सुविधादेखील उपलब्ध आहे.
रणवीरची आई अंजू भवनानी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ५ सप्टेंबरला १९.१३ कोटी रुपयांना शेजारील अपार्टमेंट विकत घेतले होते. ही मालमत्ता १,८२२,४५ चौरस फूट पसरली आहे.स्क्वेअर यार्डने शेअर केलेल्या रिपोर्ट्सनुसार, या करारासाठी दीपिकाच्या सासूने ३० हजाराच्या नोंदणी शुल्कासह तब्बल ९५. ६८ लाख रुपये भरले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, बॉलीवूडचे लोकप्रिय कपल असणाऱ्या रणवीर-दीपिकाने याआधीही आणखी एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे. रिपोर्टनुसार, बांद्रा बँडस्टँडजवळ असणाऱ्या शाहरुख खानच्या मन्नत जवळ स्थित या दोघांनी एक सीफेसिंग अपार्टमेंट खरेदी केलं आहे. हे अपार्टमेंट११,२६६ स्क्वेअर फूट इंटीरियर स्पेस आणि अतिरिक्त १३०० स्क्वेअर फूट टेरेस स्पेसमध्ये पसरलेले आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी ८ सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलीचे स्वागत केले. शिवाय १५ सप्टेंबर रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि ती आपल्या मुलीसह घरी पोहोचली. रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या घरी लक्ष्मी आल्याची बातमी शेअर केली होती.
दीपिका पदुकोण लवकरच तिचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षी दिवाळीला रिलीज होणार आहे. रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आहे. यात रणवीर सिंगही दिसणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ AD मध्ये दीपिका शेवटची दिसली होती.