बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. त्यानंतर दीपिकाने मुलीचे नाव दुआ ठेवल्याचे समोर आले. आता चाहते रणवीर आणि दीपिकाच्या मुलीची झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. अशातच आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये ते दोघे एका छोट्या मुलीसोबत असल्याचे दिसत आहे. अनेकांनी ती दुआ असल्याचे म्हटले आहे. चला जाणून घेऊया या फोटो मागचे सत्य...
रिया पादूकोण नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे व्हायरल होणारे फोटो शेअर करण्यात आले आहेत. व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये दीपिका एका लहान मुलीला उचलून घेतले आहे. तर रणवीर या मुलीकडे प्रेमाने पाहाताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये दीपिका आणि रणवीर कॅमेऱ्याकडे पाहत असून त्यांच्यासोबत एक लहान मुलगीही पोज देताना दिसत आहे.
दीपिकाने यावर्षी सप्टेंबरमध्ये मुलगी दुआला जन्म दिला होता. तिने आपल्या मुलीच्या पायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत मुलीचे नाव दुआ पदुकोण सिंग ठेवल्याचे सांगितले. याशिवाय दीपिका आणि रणवीरने आपल्या मुलीचा कोणताही फोटो शेअर केलेला नाही. दीपिका पहिल्यांदा आपल्या मुलीसोबत दिसली तेव्हाही तिने मुलीचा चेहरा झाकून ठेवला होता. दीपिका जेव्हा मुलीला घेऊन जाते तेव्हा तिचा चेहरा फोटोग्राफर्सपासून लपवून ठेवते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दुआ नाही.
वाचा: 'या' मराठमोळ्या मॉडेलच्या न्यूड पोजने ९०च्या दशकात उडवली होती खळबळ, १४ वर्षे चालला खटला
संबंधित बातम्या