Deepika Padukone baby: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला काल डिलिवरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता दीपिका आणि रणवीरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याची माहिती समोर आली आहे. दीपिकाला मुलगी झाली आहे. ही गूड न्यूज ऐकून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दीपिकाची प्रकृती ठीक आहे. रणवीर आणि दीपिकाने याबाबत सोशल मीडियावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीपिका आणि रणवीरचा एक फोटो शेअर केला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो दीपिकाच्या मॅटर्निटी शूटमधील आहे. या फोटोवर त्याने 'मुलगी झाली' असे कॅप्शन दिले आहे. तसेच हा फोटो शेअर करत विरल भय्यानीने दीपिका आणि रणवीर सिंगला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपिका आणि रणवीरने अद्याप कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. आता हे कपल त्यांच्या मुलीचे काय नाव ठेवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चाहते आता रणवीर आणि दीपिकाच्या सोशल मीडिया पोस्टची वाट पाहात आहेत.
वाचा: बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?
गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी दीपिका पादूकोण ही रणवीर सिंहसोबत मुंबईतल सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दरम्यान, दीपिकाने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. तर रणवीरने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. त्यांचे दर्शन घेतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्याच्या एक दिवसानंतरच म्हणजे काल संध्याकाळी दीपिकाला मुंबईतील रुग्णालयात दाखल केले. आता दीपिकाला मुलगी झाल्याची माहिती समोर आली आहे.