Deepika Padukone: कोणी तरी येणार येणार गं! दीपिका पादुकोण मुंबईतील रुग्णालयात दाखल-deepika padukone admitted to hospital for delivery ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepika Padukone: कोणी तरी येणार येणार गं! दीपिका पादुकोण मुंबईतील रुग्णालयात दाखल

Deepika Padukone: कोणी तरी येणार येणार गं! दीपिका पादुकोण मुंबईतील रुग्णालयात दाखल

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 08, 2024 08:49 AM IST

Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण ही ९ महिन्यांची प्रेग्नंट आहे. काल संध्याकाळी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गूड न्यूज जाणून घेण्यासाठी दीपिकाचे चाहते आतुर आहेत.

Deepika Padukone
Deepika Padukone

Deepika Padukone Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून प्रेग्नंट असल्यामुळे विशेष चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिकाचे पहिले अपत्य मुलगा होणार की, मुलगी हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. आता दीपिकाला मुंबईतील रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी दीपिका पादूकोण ही रणवीर सिंहसोबत मुंबईतल सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दरम्यान, दीपिकाने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. तर रणवीरने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. त्यांचे दर्शन घेतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्याच्या एक दिवसानंतरच म्हणजे काल संध्याकाळी दीपिकाला मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे. आता दीपिकाला मुलगा होणार की मुलगी हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

सप्टेंबर महिन्यात दीपिका पादुकोण ही आपल्या आपल्या जन्म देणार असल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. पण दीपिका ही परदेशात बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परदेशात नाही तर मुंबईतीच दीपिका बाळाला जन्म देणार असल्याचे समोर आले.आता अभिनेत्रीची कार मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसली आहे. रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण हिला एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात डिलीवरीसाठी दाखल करण्यात आलंय. असेही सांगितले जातंय की, दीपिका पादुकोण कोणत्याही क्षणी आपल्या बाळाला जन्म देऊ शकते.

कुटुंबीय पोहोचले रुग्णालयात

दीपिकासोबत कुटुंबातील इतरही सदस्य रूग्णालयात दाखल झाली आहेत. दीपिका पादुकोण ही २८ सप्टेंबरला बाळाला जन्म देणार असल्याचीही चर्चा रंगताना दिसली. आता दीपिका रूग्णालयात दाखल झालीये. कोणत्याही क्षणी दीपिका पादुकोण बाळाला जन्म देऊ शकते. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी २०१८ मध्ये लग्न केले. आता लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका बाळाला जन्म देत आहे.
Deepika Padukone Photos: प्रेग्नंसी ग्लो! दीपिका पादूकोणने शेअर केले बेबी बंपसोबतचे खास फोटो 

दीपिका-रणवीर नवीन घरात राहायला जाणार?

नुकतेच दीपिकाच्या सासूनेही लवकरच येणाऱ्या बाळाबद्दल आनंद व्यक्त केला होता आणि सर्वांचे आभारही मानले होते. दीपिका आणि रणवीर देखील त्यांच्या अपत्याबद्दल खूप उत्सुक आहेत. तसेच, मुलाच्या जन्मानंतर, जोडपे ११० कोटी रुपयांच्या नवीन घरात शिफ्ट होऊ शकतात. विशेष म्हणजे, सध्या दीपिका तिच्या कामापासून दूर आहे. मात्र, बाळाच्या जन्मानंतर दीपिका ब्रेकवर जाणार असल्याचे बोलले जात आहे. दीपिकाला तिच्या बाळाला पूर्ण वेळ द्यायचा आहे आणि त्यामुळे ती प्रसूतीनंतर लगेच कामावर परतणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री काही महिने तिच्या बाळाची काळजी घेईल आणि पुढच्या वर्षीच कामावर परत येईल. प्रसूती रजेनंतर दीपिका अमिताभ बच्चन, कमल हासन आणि प्रभाससोबत कल्कीच्या सिक्वेलच्या शूटिंगमध्ये व्यस्त होईल.

Whats_app_banner