बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. पाच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, जॅकी श्रॉफ, करीना कपूर आणि अर्जुन कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात बॉलिवूडचे सर्व मोठे चेहरे दिसणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटासाठी कोणता स्टार किती फी घेत आहे.
रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात अजय देवगणला सर्वाधिक मानधन मिळाले आहे. 'जागरण'ने दिलेल्या वृत्तानुसार, अजय देवगणने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये घेतले आहेत. तर चित्रपटात अजय देवगणनंतर अक्षय कुमारला सर्वाधिक मानधन मिळत आहे. अक्षय कुमारने या चित्रपटासाठी २० कोटी रुपये घेतले आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि करिना कपूर यांच्या फीबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूरला या चित्रपटासाठी दीपिकापेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत. लेडी सिंघम दीपिकाला या चित्रपटासाठी ६ कोटी रुपये मिळत आहेत. तर, करिना कपूरची फी १० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
'सिंघम अगेन' या चित्रपटात अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुन कपूरला या चित्रपटासाठी ६ कोटी रुपये मानधन मिळत आहे. रणवीर सिंगबद्दल बोलायचे झाले तर त्याला या चित्रपटासाठी १० कोटी रुपये मिळाले आहेत. जॅकी श्रॉफला या चित्रपटात दोन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. तर टायगर श्रॉफला ३ कोटी रुपये मिळत आहेत.
वाचा: भर मांडवात राणी मुखर्जीवर चिडली काजोल, फटका मारतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
'सिंघम अगेन' या चित्रपटात अजय देवगण त्याची पत्नी करीना कपूर खानला वाचवण्यासाठी जे प्रयत्न करणार आहे ते दिसणार आहे. करीना आणि अजय यांना एक मुलगा असल्याचे दिसत आहे. बाकी सर्व कलाकार हे पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर हे कुख्यात गुंडाची भूमिका साकारणार आहेत.
यापूर्वी 'सिंघम अगेन' हा चित्रपट १५ ऑगस्टरोजी प्रदर्शित होणार होता. पण त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले. त्यानंतर आता दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट धमाल उडवणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा 'भूल भुलैया ३' हा चित्रपटही दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. तरी निर्मात्यांनी हा चित्रपट ठरलेल्या वेळेत म्हणजेच १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.