मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aryan Arora: अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, केअरटेकरने स्टंपने फोडले डोके

Aryan Arora: अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, केअरटेकरने स्टंपने फोडले डोके

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 31, 2023 08:36 AM IST

Attack on Aryan Arora: अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला झाला असून त्याच्या डोक्याला जवळपास १२ टाके पडले आहेत. सध्या अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Aryan Arora
Aryan Arora

उत्तर प्रदेशमधील आगरा येथे राहणारा फिल्मी कलाकार आर्यन आरोरावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी दयालबाग येथील ढिल्लन क्रिकेट अॅकेडमी येथे धडली. गाडी पार्किंगवरुन केअरटेकर आणि आर्यन यांच्यामध्ये वाद झाला. रागात केअर टेकरने आर्यनच्या डोक्यात स्टंप घातला. त्यानंतर आर्यनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारण त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

आर्यनाल जखमी अवस्थेत मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला जवळपास १२ टाके पडले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी केअरटेकर विरोधात मारहाण, जीवघेणा हल्ला आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वाचा: मॅडम बटण तर लावा; जंगल सफारीला गेलेली अभिनेत्री ड्रेसमुळे झाली ट्रोल

अभिनेता आर्यन अरोराने चित्रपट आणि काही मालिकांमध्ये सहकलाकार म्हणून दिसला होता. तो मुंबईमध्ये राहातो. सुट्ट्या असल्यामुळे तो घरी आला होता. आर्यनच्या वडिलांनी पोलिसांनी माहिती दिली की, मुलगा शुक्रवारी संध्याकाळी मित्रांसोबत दयालबागचे सिकंदरपुर गावात असलेल्या ढिल्लन अॅकेडमीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. दोन कारमध्ये ते सगळे घेले होते. मुलाने गाडी उभी केल्यामुळे तेथील केअरटेकर श्रीकृष्णासोबत त्याचा वाद झाला. त्याने रागात कारची चावी हिस्कावून घेतली. मुलाने विरोध केला. त्यामुळे केअरटेकरने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. स्टंपने थेट डोक्यावर हल्ला केला.

आर्यन जखमी झाला. तेवढ्यात आर्यनचे मित्र त्याला पकडण्यास गाडीतून खाली उतरले. तो पर्यंत केअरटेकर तेथून लंपास झाला होता. मित्रांनी आर्यनला रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला जवळपास १२ टाके पडले आहेत. सीटी स्कॅन करण्यात आले.

WhatsApp channel

विभाग