फिल्म इंडस्ट्रीमधील प्रत्येकाचा काळ हा चांगला वाईट असतो. एखादा दिग्दर्शक एकापाठोपाठ एक हिट सिनेमा जेव्हा देतो तेव्हा त्यांच्या सिनेमांची मागणी देखील वाढते. त्याच्या प्रत्येक सिनेमाचे बजेट वाढत असते. राजामौली, सुकुमार, भन्साळी, प्रशांत नील यांसारख्या दिग्दर्शकांनी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. पण तुम्हाला माहित आहे का ९०च्या शकात डेव्हिड धवनच्या बाबतीतही असंच काहीसं घडत होतं. डेव्हिड धवन ज्या चित्रपटाला हात लावत असे, तो ब्लॉकबस्टर ठरत असे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यासाठी सर्वजण आतुर होते. पण गोविंदासोबतचा त्याचा एक सिनेमा असा होता ज्याची कथा नंतर लिहिण्यात आली. आधी सिनेमाची गाणी शूट करण्यात आली होती. चला जाणून घेऊया या सिनेमाविषयी...
९०च्या दशकात दिग्दर्शक डेव्हिड धवनसोबत काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा होती. डेव्हिडच्या अशाच एका सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. या चित्रपटात गोविंदा आणि उर्मिला मातोंडकर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यावेळी १९ कोटी ३४ लाख रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाची कथा नंतर लिहिली गेली आणि त्यातील चार गाणी आधीच चित्रीत झाली होती, हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आता जाणून घेऊया असं का घडलं.
चित्रपटाची कथा लिहिणारे लेखक युनूस सेजेवाल यांनी एका मुलाखतीदरम्यान हा किस्सा सांगितला. युनूस म्हणाला, "डेव्हिडजींचा काळ असा चालला होता की सगळ्यांना डेव्हिडजी हवे होते. डेव्हिड जी, तुम्ही हा चित्रपट करावा अशी सर्वांची इच्छा होती. पूर्वी दिग्दर्शकावर एवढा विश्वास होता. तेव्हा गोविंदा सर आणि डेव्हिड जी ही जोडी हिट होती. एका सिनेमाचे शुटिंग त्यांनी अगदी सहज केलं. त्या चित्रपटाची कथा नव्हती. पण त्यांनी परदेशात जाऊन ३-४ गाणी शूट केली. त्यानंतर भारतात येऊन कथा लिहिली."
वाचा: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास अडकणार विवाहबंधनात, कोण आहे ती मुलगी?
लेखक म्हणाला, "मग चिरंजीवी सरांचा दाक्षिणात्य चित्रपट होता, आम्ही त्याचा अधिकृत रिमेक लिहिला. पण हे एकमेव प्रकरण नाही. जेव्हा आम्ही 'चल मेरे भाई'चं शूटिंग करत होतो, तेव्हा आम्ही एकच बेसिक ओळ म्हणायचो सर. विश्वासावर काम करण्यात आले. मग त्या पद्धतीने चित्रपट बनवण्यात आला. गोविंदा आणि डेव्हिड धवन या जोडीने त्या काळात डझनभर हिट चित्रपट दिले होते, जे आजही लोकांना रिकाम्या वेळेत टीव्हीवर एन्जॉय करायला आवडतात."
संबंधित बातम्या