मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dancer Sunil Jadhav Died: मराठी सिनेमाच्या शुटिंगदरम्यान डान्सर सुनील जाधवचा मृत्यू

Dancer Sunil Jadhav Died: मराठी सिनेमाच्या शुटिंगदरम्यान डान्सर सुनील जाधवचा मृत्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 11, 2024 11:05 AM IST

Dancer Sunil Jadhav Passed Away: डान्सर सुनील जाधवचा मराठी चित्रपट 'वीर गरजा बाजी'च्या गाण्याची प्रॅक्टीस करताना मृत्यू झाला आहे.

Dancer Sunil Jadhav
Dancer Sunil Jadhav

Dancer Sunil Jadhav Death: डान्सर सुनील जाधवचे वयाच्या ३७व्या वर्षी निधन झाले आहे. मराठी चित्रपट 'वीर गरजा बाजी'मधील गाण्याची प्रॅक्टीस करत असताना कार्डिअॅक्ट अरेस्टने निधन झाले आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे काहींनी सुनीलला श्रद्धांजली वाहिली आहे.

सुनील जाधवच्या निधनानंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. इंडस्ट्रीमधील काही डान्सर, कॉर्डीनेटर आणि कोरिओग्राफर कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले आहेत. कॉर्डीनेटर राज सुरानीने सुनीलला नेहमीच मदत केली आहे. आता त्याच्या निधनानंतर तो त्याच्या कुटुंबीयांच्या देखील मदतीस धावून आला आहे. 'आम्ही आतापर्यंत जवळपास १ लाख २५ हजार रुपये जमा केले आहे आणि आमचा आणखी जमवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही हे पैसे सुनीलच्या कुटुंबीयांना देणार आहोत' अशी माहिती राजने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.
वाचा: जय श्रीराम! अमिताभ बच्चन पोहोचले अयोध्येत

डान्सर, कॉर्डीनेटर आणि कोरिओग्राफर व्यतरिक्त ऑल इंडिया फिल्म आणि टेलिव्हिजन डान्सर असोसिएशनने सुनीलच्या कुटुंबीयांना १ लाख ५० हजार रुपयांची मदत केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष गंगेश्वर श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे. 'आम्ही दीड लाख रुपयांची मदत केल आहे आणि प्रोडक्शन हाऊसच्या संपर्कात देखील आहोत. जेणेकरुन त्याच्या कुटुंबीयांची मदत होईल' असे श्रीवास्तव म्हणाले.

WhatsApp channel

विभाग