मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

Aarti Vilas Borade HT Marathi
May 20, 2024 05:17 PM IST

गौतमी पाटील आणि उत्कर्ष शिंदे यांचा एक नवा अल्बम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या अल्बमवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले
गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

आपल्या सौंदर्याने आणि मादक अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगना गौतमी पाटील कायमच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. खेड्यापाड्यात आयोजित करण्यात आलेल्या गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमांना तुडूंब गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. कधीकधी ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त करण्यात आला होता. नुकताच गौतमी आणि गायक आदर्श शिंदेचा एक अल्बम प्रदर्शित झाला होता. पण या अल्बमवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उत्कर्ष शिंदेने काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलसोबत एक फोटोशूट केले होते. या फोटोशूटमधील फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. नेमकं काय प्रकरण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यानंतर त्यांचा 'आलं बया दाजी माझं' अल्बम प्रदर्शित झाला. पण नेटकऱ्यांनी या अल्बमवर आता नाराजी व्यक्त केली आहे.
वाचा: उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

काय आहे प्रकरण?

गौतमी पाटीलच्या 'आलं बया दाजी माझं' या अल्बमचे चित्रीकरण हे एका गड किल्ल्यावर करण्यात आले आहे. ते पाहू नेटकऱ्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने कमेंट करत 'आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकल आहे. हेच घायचे बाकी होते' असे म्हटले आहे.‘छान अशीच वाढवा आमच्या गडकिल्ल्यांची शोभा’, ‘शिवाजी महाराजांची थोडीशी तरी इज्जत ठेवा’, ‘मला माहित आहे तुम्ही जे करता ती तुमची कला आहे, पण गड किल्ल्यांवर असे डान्स शूट करू नका मॅडम,’ ‘ते गडकिल्ले तुमच्या बापाचे नाही…हे गडकिल्ले महाराजाची आणि महाराष्ट्राची शान आहे समजलं का?’ अशा अनेक कमेंट केल्या आहेत.
वाचा: अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

गौतमी पाटील कमेंट्स
गौतमी पाटील कमेंट्स

काय आहे नवा अल्बम?

गौतमी पाटील आणि उत्कर्ष शिंदेच्या या नव्या अल्बमचे नाव आलं बाई दाजी माझं असे आहे. या अल्बममध्ये गौतमी आणि उत्कर्ष शिंदे डान्स करताना दिसत आहेत. तसेच उत्कर्ष शिंदेने हा अल्बम लिहिला आहे. तसेच दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. हे गाणे वर्षा इखंडेने गायले आहे. गाण्यामध्ये गौतमीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. केसात गजरा, नाकात नथ असा गौतमीचा घायाळ लूक दिसत आहे. तर उत्कर्षने काळ्या रंगाचे ब्लेझर घातले आहे. दोघांचा ही लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वाचा: मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग