मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नितीन आणि गौरवने जिंकला 'डान्स दिवाने ४' शो, बक्षिस म्हणून किती रक्कम मिळाली जाणून घ्या

नितीन आणि गौरवने जिंकला 'डान्स दिवाने ४' शो, बक्षिस म्हणून किती रक्कम मिळाली जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
May 26, 2024 09:24 AM IST

गेल्या दिवसांपासून ‘डान्स दीवाने ४’ हा रिअॅलिटी डान्स शो चर्चेत होता. आता अखेर या शोचा विजेता समोर आला आहे. पण विजेत्याला काय बक्षिस मिळाले हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

 'डान्स दिवाने ४' शो विजेते
'डान्स दिवाने ४' शो विजेते

कलर्स वाहिनीवरील ‘डान्स दिवाने ४’ हा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचा विजेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता स्पर्धक नितीन आणि गौरव यांनी डान्स रिअॅलिटी शो जिंकला असल्याची माहिती समोर आली आहे. पण जिंकलेल्या स्पर्धकांना काय बक्षिस मिळाले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘डान्स दिवाने ४’ हा रिअॅलिटी शो जिंकणाऱ्या विजेत्यांना रोख बक्षीस आणि ट्रॉफी म्हणून २० लाख रुपये देण्यात आले आहेत. नितीन हा मूळचा बेंगळुरूचा आहे तर गौरव दिल्लीचा आहे. दोघांनी मेहनत घेत ‘डान्स दिवाने ४’चा ताज स्वत:च्या नावे केला आहे.
वाचा: उफ्फ ये अदाये! अमृता खानविलकरने मुंबई पोलिसांसाठी असे का म्हटले? नेमकं काय आहे प्रकरण

नितीन आणि गौरवने जिंकला डान्स दिवाने ४

कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘डान्स दिवाने ४’च्या विजेत्यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत, "डांस दीवानेची ट्रॉफी जिंकली गौरव आणि नितीन यांनी. दोन्हीही विजेत्यांचे मनापासून अभिनंदन' असे कॅप्शन देण्यात आले आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टी या डान्स रिअॅलिटी शोचे परीक्षक आहेत. 'डान्स दिवाने 4' कलर्स वाहिनीवर प्रसारित होत आहे.
वाचा: ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये गौरव मोरेचा अनोखा प्रयोग, सादर करणार हॉरर अॅक्ट

विजेत्यांबद्दल माधुरी काय म्हणाली

‘ट्रॉफी जिंकल्याबद्दल नितीन आणि गौरवचे अभिनंदन आणि प्रेक्षकांचेही आभार! त्यांचे अनेक डान्स परफॉर्मन्स उत्कृष्ट होते आणि मला खात्री आहे की त्यांची कला जगाला चकित करत राहील’ असे माधुरी विजेत्यांविषयी म्हणाली.
वाचा: मराठी नाटकावर आधारित वेब सीरिज येणार! पाहा घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर

ती पुढे म्हणाली, “त्यांच्या या प्रवासात माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या कलेचा गौरव करण्यात आला. त्यांना कलाकार म्हणून त्यांची होणारी प्रगती पाहून मला आनंद झाला आहे. यंदाच्या सिझनची ट्रॉफी देताना मला अत्यंत आनंद होत आणि मला खात्री आहे की ते तरुण पिढीला प्रेरणा ठरतील.”

डान्स दीवाने ४ च्या ग्रँड फिनालेबद्दल

शोमध्ये माधुरीने गौरव आणि नितीनला अनेकदा शगुन म्हणून १०१ रुपये देण्यात आले होते. डान्स रिअॅलिटी शोच्या ग्रँड फिनाले एपिसोडमध्ये सुनील शेट्टीने संदेसे आते है या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. तर माधुरीने खोया हैं वर डान्स केला.

टी-२० वर्ल्डकप २०२४