Daler Mehndi Birthday: भाऊ मिका सिंहचा पण नाव दलेर मेहंदी! असं कसं? वाचा प्रसिद्ध गायकाच्या नावाचा भन्नाट किस्सा-daler mehndi birthday special read the amazing story of the famous singers name ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Daler Mehndi Birthday: भाऊ मिका सिंहचा पण नाव दलेर मेहंदी! असं कसं? वाचा प्रसिद्ध गायकाच्या नावाचा भन्नाट किस्सा

Daler Mehndi Birthday: भाऊ मिका सिंहचा पण नाव दलेर मेहंदी! असं कसं? वाचा प्रसिद्ध गायकाच्या नावाचा भन्नाट किस्सा

Aug 18, 2024 08:24 AM IST

Daler Mehndi Birthday Special: आजच्या पिढीला अनेकदा असा प्रश्न पडतो की, दलेर मेहंदी हा गायक मिका सिंहचा भाऊ आहे. मग, या दोघांच्या नावात इतका फरक कसा?

Daler Mehndi Birthday
Daler Mehndi Birthday

Daler Mehndi Birthday Special: हिंदी पॉप गाण्यांचा उल्लेख करताना दलेर मेहंदी या नावाचा उल्लेख झाला नाही, असं क्वचितच कधी घडलं असेल. संगीताची आवड जोपासण्यासाठी स्वतःचं घर सोडून निघालेल्या दलेर मेहंदीला आजघडीला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. १८ ऑगस्ट १९६७ रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे जन्मलेल्या दलेर मेहंदीच्या गाण्यांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. आजच्या पिढीला अनेकदा असा प्रश्न पडतो की, दलेर मेहंदी हा गायक मिका सिंहचा भाऊ आहे. मग, या दोघांच्या नावात इतका फरक कसा? चला तर, जाणून घेऊया या मागचा भन्नाट किस्सा... 

त्यांच्या या नावामागे देखील एक किस्सा आहे. दलेर मेहंदी नावातील दोन्ही शब्दांचा वेगवेगळ्या लोकांशी संबंध आहे. त्यांच्या नावाचा पहिला शब्द म्हणजेच दलेर हा एका डाकूशी संबंधित आहे. दलेर मेहंदी यांचा जन्म झाला, तेव्हा डाकू दलेर सिंहची खूप दहशत होती. म्हणूनच त्यांच्या पालकांनी आपल्या मुलाचे नाव दलेर ठेवले. त्याच वेळी, दलेर जेव्हा मोठे होत होते, तेव्हा त्यांच्या नावात मेहंदी हा शब्द जोडला गेला. मेहंदी हा शब्द तत्कालीन प्रसिद्ध गायक परवेझ मेहंदी यांच्या नावावरून घेण्यात आला होता. 

घरातून मिळाला गाण्याचा वारसा

दलेर मेहंदी यांनी लहानपणापासूनच संगीताचे शिक्षण घेतले होते. कारण त्यांच्या कुटुंबात सात पिढ्यांपासून गाण्याचा वारसा होता. दलेर यांना त्यांचे वडील सरदार अजमेर सिंह चंदन यांनी राग आणि शब्द शिकवले होते. जेव्हा ते ११ वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी गाण्याची आवड पूर्ण करण्यासाठी घर सोडले आणि गोरखपूरमध्ये उस्ताद राहत अली खान साहब यांच्याकडे गेले. वयाच्या १३व्या वर्षी त्यांनी जौनपूरमध्ये २०हजार लोकांसमोर पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला. 

Gulzar Birthday: गॅरेज मेकॅनिक कसा बनला बॉलिवूडचा लाडका ‘गुलजार’? वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी!

दलेर मेहंदी यांनी आपल्या आवाजाने पंजाबी इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. पण, त्यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होऊ शकले नव्हते. खरं तर, अमिताभ बच्चन यांनी त्यांना बोलावून गाण्यास सांगावे, अशी त्यांची इच्छा होती. दलेर यांनी ही इच्छा बोलून दाखवताच दोन महिन्यांनी बिग बींनी त्यांना बोलावले. त्यानंतर त्यांनी अमिताभ यांच्या 'मृत्युदाता' चित्रपटातील ‘ना ना ना रे’ हे गाणे गायले. यानंतर ते बॉलिवूडचे सर्वोत्कृष्ट गायकही बनले. 

वादांशी जोडले गेलेय नाव

दलेर मेहंदी यांचे नाव अनेक वादांशीही जोडले गेले होते. त्याच्यावर पैसे घेऊन लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप होता. या आरोपात त्यांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान दलेर यांच्यावरील आरोप खरे ठरले, त्यामुळे त्यांना दोन वर्षे कारावास भोगावा लागला. याशिवाय ‘झूम बराबर झूम’ या गाण्यातील आवाजाबाबत यशराज फिल्म्ससोबतही त्यांचे भांडण झाले होते. खरंतर या गाण्यात दलेर मेहंदीऐवजी शंकर महादेवनचा आवाज वापरण्यात आला होता, त्यामुळे दलेर यांनी यशराज फिल्म्सवर गुन्हा दाखल केला होता.

विभाग