Dahi Handi 2024: 'शिवा', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकांमध्ये पाहायला मिळणार दहीहंडीची धामधूम!-dahi handi 2024 in marathi tv serial shri krishna janmashtami special episodes on zee marathi serials ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dahi Handi 2024: 'शिवा', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकांमध्ये पाहायला मिळणार दहीहंडीची धामधूम!

Dahi Handi 2024: 'शिवा', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकांमध्ये पाहायला मिळणार दहीहंडीची धामधूम!

Aug 26, 2024 12:46 PM IST

Dahi Handi 2024 In Marathi Serial: छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांमध्ये यावर्षी दही हंडीची धूम पाहायला मिळणार आहे. शिवा, लीला आणि अधिपती हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Dahi Handi 2024: मालिकांमध्ये पाहायला मिळणार दहीहंडीची धामधूम!
Dahi Handi 2024: मालिकांमध्ये पाहायला मिळणार दहीहंडीची धामधूम!

Dahi Handi 2024 In Marathi TV Serial: कृष्णजन्माष्टमी हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. श्रीकृष्ण जन्माचा हा सोहळा जन्माष्टमीच्या रात्री साजरा केला जातो. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशी उंचावर बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा लागते. आता असंच काहीसं ‘झी मराठी’च्या तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. या मालिकांमध्ये 'दहीहंडी' विशेष भाग साजरे होणार आहेत.

आशु शिवाला मदत करणार!

'शिवा' च्या लग्नानंतरच्या पहिल्या दहीहंडी उत्सवासाठी शिवाला आपल्या वस्तीत जायचं आहे. पण, सीताई शिवाला दहीहंडीसाठी वस्तीत जायला नकार देते. भाऊ सीताईची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तरीही सीताई नकारच देते. आता शिवाने गोपाळकाल्याच्या पूजेची तयारी सुरू केली आहे. मात्र, चाळीत यावेळी पाना गँग शिवा दहीहंडीसाठी नसणार म्हणून उदास आहे. आशु, शिवाला वस्तीत घेऊन जाण्यासाठी एक आयडिया करणार आहे. घरात टेप रेकॉर्ड लावून आशु, शिवाला दहीहंडीसाठी घेऊन जाणार आहे. यादरम्यान कीर्ती आणि सुहासला याचा सुगावा लागणार आहे. शिवा तिच्या खास लूकमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी येणार आहे. कीर्ती आणि सुहास पिंट्याशेठला पैसे देउन शिवाला दुखापत करण्यास सांगणार आहेत. आता हंडी फोडताना खरंच शिवाला दुखापत होईल? की आशु तिच्या मदतीला धावून येईल हे दहीहंडी विशेष भागात पाहायला मिळणार आहे.

Indrayani: गोविंदा रे गोपाळा! 'इंद्रायणी' मालिकेत दहीहंडीचा उत्साह; इंदू फोडणार दहीहंडी

अधिपतीच्या जीवाला धोका!

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये सुर्यवंशीच्या घरात गोकुळाष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. चारुहास आणि अक्षरा साग्रसंगीत पूजा मांडणार आहेत. यावेळी श्रीकृष्णाचा पाळणा हलवला जाणार आहे. आता या सोहळ्यात अक्षराला काही बायकां बाळ हवं म्हणून चिडवणार आहेत. पण, चारुलता बायकांना चांगलीच समज देणार आहे. चारुलताने पाठीशी उभं राहणं अक्षराला भावनिक करणार आहे. भुवनेश्वरी आणि चारुलतामध्ये किती फरक आहे, याची जाणीव अधिपतीला सोडून सगळ्यांनाच होतेय. अधिपती ही दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक होऊन तयार होणार आहे. पण, चारुलता त्याला इतक्या उंच थरावर दही हंडी लावून फोडणे बरे नाही, असा सल्ला देणार आहे. मात्र, अधिपती चारुलताच बोलणं न ऐकताच निघून जाणार आहे. अधिपतीसाठी दहीहंडीच्या इथे आधीच कट रचला गेला आहे, ज्यामुळे आता त्याला हंडी फोडताना दुखापत होणार आहे. अधिपतीच्या जीवाला धोका आहे हे त्याला कळू शकेल का? हे येत्या भागात कळणार आहे.

लीला-अभिरामच्या नात्याची नवी सुरुवात होणार!

'नवरी मिळे हिटलरला'मध्ये लीला एजेने दिलेले पैसे फेडण्यासाठी म्हणून दडीहांडी खेळायचं ठरवते. जी हंडी फोडण्यासाठी लीला जायचा विचार करतेय, त्या हंडीला मोठं बक्षिसं लावण्यात आलं आहे. मात्र, तिथे एजेच गेस्ट म्हणून येणार आहे, याची लीलाला जाणीव नाही. लीला एजेला न सांगता दडीहांडीसाठी आलेली आहे. त्यामुळे लीलाला ती हंडी फोडताना पाहून एजेला धक्का बसणार आहे. लिलाच्या काळजीपोटी एजे तिला खूप रागवणार आहेत. पण, हे तिने का केलं आहे हे कळताच तो लीलाच्या घरी जाऊन साळुंकेचं कर्ज फेडणार आहे. एजे तिची आणि तिच्या माहेरच्या माणसांची इतकी काळजी करतो आहे, हे पाहून लीलाच्या मनात एजे विषय भावना जाग्या होणार आहेत. आता लीला-एजेमध्ये प्रेमाच्या नात्याची सुरुवात होईल का? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.