मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dadasaheb Phalke Awards: बॉबी देओल ठरला सर्वोत्कृष्ट खलनायक, वाचा विजेत्यांची यादी

Dadasaheb Phalke Awards: बॉबी देओल ठरला सर्वोत्कृष्ट खलनायक, वाचा विजेत्यांची यादी

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 21, 2024 08:15 AM IST

Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2024 Winners : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता बॉबी देओलला सर्वोत्कृष्ट खलनायक हा पुरस्कार मिळाला. मग सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणाला मिळाला जाणून घ्या...

Dadasaheb Phalke
Dadasaheb Phalke

Dadasaheb Phalke Award Winner list: भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून 'दादासाहेब फाळके पुरस्कार’ ओळखला जातो. हा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बॉलिवूडचे दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्याची कलाकार वर्षभर वाट पाहात असतात. यंदा बॉलिवूडचा किंग खान शाहरुखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. तर बॉबी देओल आणि संदीप रेड्डी वांगा यांना अॅनिमल चित्रपटासाठी गौरवण्यात आले.

'दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोहळ्या मोठ्या थाटामाटत पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील कलाकारांनी देखील हजेरी लावली. शाहरुख खान, राणी मुखर्जी, बॉबी देओल, शाहीद कपूर, विकी कौशल आणि नयनतारा हे कलाकार या सोहळ्यात दिसले. आता कोणत्या चित्रपटासाठी कोणाला पुरस्कार मिळाला हे जाणून घेऊया...
वाचा: “मी हिंदी चित्रपट पाहणं बंद केलय कारण...", नसीरुद्दीन शाह यांचा मोठा खुलासा

दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान (जवान)

Best Actor: Shah Rukh Khan (Jawan)

सर्वोतृष्ट अभिनेत्री : यनतारा (जवान)

Best Actress: Nayanthara (Jawan)

सर्वोत्कृष्ट खलनायक (निगेटिव्ह रोल) - बॉबी देओल (अनिमल)

Best Actor in Negative Role: Bobby Deol (Animal)

सर्वोतृष्ट दिगदर्शक - संदीप रेड्डी वांगा (अॅनिमल)

Best Director: Sandeep Reddy Vanga (Animal)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक) - विकी कौशल (सॅम बहादुर)

Best Actor (Critics): Vicky Kaushal (Sam Bahadur)

ओटीटीवर पाहाता येणार पुरस्कार सोहळा

दादासाहेब फाळके हा पुरस्कार सोहळा झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

IPL_Entry_Point

विभाग