मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dadasaheb Phalke: समाजाचा नकार, आर्थिक तंगी पण नंतर बैलगाडी भरून पैसे; दादासाहेब फळकेंविषयी खास गोष्टी

Dadasaheb Phalke: समाजाचा नकार, आर्थिक तंगी पण नंतर बैलगाडी भरून पैसे; दादासाहेब फळकेंविषयी खास गोष्टी

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 16, 2024 09:59 AM IST

Dadasaheb Phalke Death Anniversary: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘राजा हरिश्चंद्र’ एक मैलाचा दगड ठरला खरा. पण, तो साकारण्यासाठी दादासाहेबांच्या वाटेत आलेल्या अडचणी काही कमी नव्हत्या.

Dadasaheb Phalke
Dadasaheb Phalke

Dadasaheb Phalke: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज १६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी. ते चित्रपट महर्षी म्हणून ओळखले जातात. दादासाहेबांनी निर्माण केलेल्या चित्रपटांची जादू आज भारतभर पसरली आहे. त्यामध्ये अनेक सुधारणा होऊन चित्रपटसृष्टी हे एक मोठे क्षेत्र तयार झाले आहे. आजवर हजारो कलावंत घडवणाऱ्या या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके या मराठमोळ्या व्यक्तीच्या उत्तुंग कर्तृत्वाने रोवली गेली होती. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

दादासाहेबांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ३० एप्रिल १८७० रोजी झाला. लहानपणापासूनच दादासाहेब हे इतर मुलांपेक्षा वेगळे होते. त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल, मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८८५ मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि मॉडेलिंग केले. त्यानंतर त्यांनी भारतात चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय़ घेतला. त्यासाठी त्यांनी दाद येथे फाळके चित्रपटनिर्मितिगृहाची स्थापना केली.
वाचा: कतारला जाण्यासाठी जितेंद्र जोशीला आशुतोष गोवारीकरांनी केली होती मोठी मदत, नेमकं काय

प्रचंड मेहतनत घेतल्यानंतर दादासाहेब हे १९१३ साली यशस्वी झाले. त्यांचा पहिला मुखपट ‘राजा हरिश्चंद्र‘ हा तयार झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास घडला. वयाच्या १९व्या वर्षी दादासाहेब यांनी ९५ चित्रपट २६ लघुपटांची निर्मिती केली. या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांचा त्यांना पू्र्ण पाठिंबा होता. सुरुवातील चित्रपट निर्मिती करण्यासाठी आर्थिक मदत दादासाहेबांना हवी होती. त्यावेळी त्यांच्या पत्नीने जवळ असलेले सर्व दागिने विकले होते. तसेच चित्रपटासाठी काम करणाऱ्या लोकांचा स्वयंपाक करणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे, त्यांचे कपडे धुणे ही कामे त्या करत. त्यासोबतच चित्रपटाशी संबंधित एडिटिंग, मिक्सिंग, फिल्म डेव्हलपिंग, कॅमेरा असिस्टंट, स्पॉट बॉय या भूमिका देखील त्यांनी पार पाडल्या.

सरस्वती बाईंच्या सहकार्याशिवाय हा चित्रपट तयारच होऊ शकला नसता, असे फाळकेनी एका मुलाखतीत सांगितले होते. ‘राजा हरिश्चंद्र‘ हा मूखपट प्रदर्शित झाल्यानंतर दादासाहेबांची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली होती. चित्रपट चांगली कमाई करु लागला होता. त्या काळात चित्रपटातून इतके पैसे मिळाले की त्यांना ते बैलगाडीभरून घरी आणावे लागले होते. मिळालेल्या पैशातून दादासाहेब यांनी अनेक प्रयोग केले. नवनव्या विषयावर चित्रपट आणले.

IPL_Entry_Point

विभाग