Dada Kondke Movie Schedule: मराठी मनोरंजन विश्वच नव्हे, तर आपल्या चित्रपटांनी बॉलिवूडलाही धडकी भरवणारे अभिनेते म्हणजे दादा कोंडके. त्यांनी आपल्या धमाकेदार चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आजही दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे चाहते दिवाने आहे. त्यांचा चित्रपट म्हंटला की, प्रेक्षक आवर्जून तो पाहतात. आता अशीच एक सुवर्णसंधी पुन्हा एकदा चालून आली आहे. आता दादा कोंडके यांचे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आता रंगीत स्वरुपात टीव्हीवर पाहता येणार आहेत.
‘झी टॉकीज’ने नेहमीच मराठी चित्रपटांना आणि गाण्यांना प्रोत्साहन दिले आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते दादा कोंडके यांच्या काही लोकप्रिय आणि अविस्मरणीय चित्रपटांना वाहिनीने रंगीत स्वरूपात सादर करून प्रेक्षकांना नवीन आनंद दिला आहे. ‘पांडू हवालदार’, ‘आंधळा मारतो डोळा’, ‘एकटा जीव’ आणि ‘सोंगाड्या’ हे दादा कोंडके यांचे चित्रपट आता झी टॉकीजवर रंगीत स्वरूपात बघायला मिळणार आहेत. दादा कोंडके यांच्या चित्रपटांमधील हास्यविनोद, गाणी आणि संवाद आजही तितकेच ताजे वाटतात. त्यांच्या चित्रपटांचे रंगीत रूपांतर प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहे.
याआधी इतर टेलिव्हिजनवर हिंदी चित्रपट ‘मुघल-ए-आझम’ आणि ‘श्री ४२०’ यांना देखील रंगीत स्वरूपात सादर करण्यात आले होते आणि ते देखील प्रेक्षकांना खूपच आवडले होते. या चित्रपटांना रंगीत करण्यामागे प्रेक्षकांच्या मनातल्या जुन्या आठवणींना ताज्या करण्याचा उद्देश आहे. २८ जुलैपासून दर रविवारी दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता दादा कोंडके यांचे सदाबहार चित्रपट ‘झी टॉकीज’वर प्रसारित होणार आहेत.
दादा कोंडके हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक महान हास्य अभिनेता होते. त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. त्यांच्या विनोदाचा अनोखा अंदाज आणि सोप्या भाषेत केलेले संवाद प्रेक्षकांच्या हृदयात घर करून राहिले आहेत. त्यांचे चित्रपट आजही तितकेच लोकप्रिय आहेत, आणि त्यांच्या चित्रपटांना रंगीत रूप दिल्यामुळे नव्या पिढीला देखील त्यांचा आनंद घेता येणार आहे. दादा कोंडके यांच्या चित्रपटांना महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी नेहमीच उदंड प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या चित्रपटांचे गाजलेले संवाद आणि गाणी आजही तितकेच लोकप्रिय आहेत. प्रेक्षकांना त्यांचे विनोद आजही ताजे वाटतात आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतात.
संबंधित बातम्या