Dada Kondke Movie: दादा कोंडके यांच्या चित्रपटांची मेजवानी; रविवारी पाहता येईल 'हा' चित्रपट!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dada Kondke Movie: दादा कोंडके यांच्या चित्रपटांची मेजवानी; रविवारी पाहता येईल 'हा' चित्रपट!

Dada Kondke Movie: दादा कोंडके यांच्या चित्रपटांची मेजवानी; रविवारी पाहता येईल 'हा' चित्रपट!

Published Nov 01, 2023 11:46 AM IST

Dada Kondke Movie On Television: दादांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या ज्युबिली स्टार सिनेमांची मेजवानी आता घरबसल्या मिळणार आहे.

Dada Kondke Movie On Television
Dada Kondke Movie On Television

Dada Kondke Movie On Television: दादा कोंडकेंचा एकही संवाद नसताना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारे चित्रपट करण्याची कला फक्त दादा कोंडके यांच्यात होती. मराठी सिनेमात विनोदाचं रसायन सापडलेले विनोदवीर म्हणजे अभिनेते दादा कोंडके. ऐतिहासिक सिनेमांचा काळ मागे पडला होता. तमाशापटांची जादू काहीशी ओसरली होती. मराठी सिनेमाच्या प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पहायचं होतं. तेव्हा दादा कोंडके यांनी विनोदी सिनेमांचं पर्व सुरू केलं. १९८० नंतर मराठी पडद्यावर अस्सल गावरान कथा, तितकाच भोळा नायक, मराठी मातीतली गाणी आणि निखळ मनोरंजन करणारे संवाद अशी भट्टी दादा कोंडके यांनी जमवली. आता त्यांच्या याच चित्रपटांचा आस्वाद पुन्हा एकदा घेता येणार आहे.

दादांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या ज्युबिली स्टार सिनेमांची मेजवानी आता घरबसल्या मिळणार आहे. दादांच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमा रविवार म्हणजेच ५ नोव्हेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता प्रेक्षकांना 'झी टॉकीज'वर पहायला मिळणार आहे. दादांचे संवाद नेहमीच हिट झाले आहेत, पण या सिनेमात एक डायलॉगही न बोलता प्रेक्षकांना लोटपोट हसवणाऱ्या अवलिया दादांची कमाल अनुभवता येणार आहे.

Bigg Boss 17: लग्न करूनही एकत्र राहत नाहीत अंकिता लोखंडे आणि विकी जैन! अभिनेत्रीचा मोठा खुलासा...

दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही एव्हरग्रीन जोडी असलेला ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. दादा कोंडके यांच्या सिनेमाचे शीर्षक हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सिनेमाच्या शीर्षकापासूनच प्रेक्षकांच्या मनसोक्त हसण्याचा प्रवास सुरू होतो तो थेट सिनेमाच्या क्लायमॅक्सपर्यंत. ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमाही याच पठडीतला आहे.

या सिनेमातील नायकाचे नाव मुक्या आणि त्याला बोलता येत नसल्याने सारं गाव त्याला “मुका मुका” अशीच हाक मारत असते. तर, दादांच्या रूपातील हा मुका नायक सिनेमात एकही डायलॉग न बोलता प्रेक्षकांना हसून कसा बेजार करतो, याची धमाल पाहणे हा प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक रविवार ठरणार आहे. करमणूक आणि प्रबोधन करणारा हा सिनेमा म्हणजे दादा कोंडके यांच्या दिग्दर्शन आणि अभिनयाची कमाल आहे. कथा पटकथा, गीतलेखन, अभिनय असा सगळा किल्ला दादांनी लढवल्याने या सिनेमाला असलेला दादांचा टच प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

Whats_app_banner