Dada Kondke: काय होता दादा कोंडके यांच्या कॉमेडीचा खास मंत्र? महेश कोठारे यांनी थेट सांगूनच टाकलं गुपित!-dada kondke birth anniversary what was the special mantra of dada kondke s comedy mahesh kothare reveals the secret ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dada Kondke: काय होता दादा कोंडके यांच्या कॉमेडीचा खास मंत्र? महेश कोठारे यांनी थेट सांगूनच टाकलं गुपित!

Dada Kondke: काय होता दादा कोंडके यांच्या कॉमेडीचा खास मंत्र? महेश कोठारे यांनी थेट सांगूनच टाकलं गुपित!

Aug 08, 2024 01:13 PM IST

Dada Kondke Birth Anniversary:अनेक जुन्या काळातील मराठी नावाजलेले कलाकार-दिग्दर्शक हे दादा कोंडके यांच्यापासून प्रेरित झाले आहेत आणि काहींना त्यांच्या सोबत काम करण्याचे भाग्यही लाभले आहे.

Mahesh Kothare And Dada Kondke
Mahesh Kothare And Dada Kondke

Dada Kondke Birth Anniversary: मराठी मनोरंजन विश्वात महेश कोठारे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या अभिनय आणि दिग्दर्शनाची कारकीर्द उल्लेखनीय आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील एक खास क्षण उलगडला. महेश कोठारे यांनी कबूल केले की, ते दादा कोंडके यांचे सर्वात मोठे चाहते आहेत आणि त्यांनी अनेक वेळा थिएटरमध्ये जाऊन दादांचा‘सोंगाड्या’ हा चित्रपट पाहिला आहे. आज दादा कोंडके यांची जयंती आहे. याच निमित्ताने त्यांनी हा किस्सा शेअर केला आहे.

‘झी टॉकीज’वर दादा कोंडके यांचे चित्रपट सध्या नेमाने दाखवले जात आहेत आणि प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या आवडत्या नायकाला तीन दशकांनंतर मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर पुन्हा पाहण्याची संधी मिळत आहे. तसं पाहिलं तर, अनेक जुन्या काळातील मराठी नावाजलेले कलाकार-दिग्दर्शक हे दादा कोंडके यांच्यापासून प्रेरित झाले आहेत आणि काहींना त्यांच्या सोबत काम करण्याचे भाग्यही लाभले आहे. अशीच एक नावाजलेली व्यक्ती म्हणजे अभिनेता-दिग्दर्शक महेश कोठारे.

महेश कोठारे आणि दादा कोंडके यांची पहिली भेट!

महेश कोठारे यांनी प्रथम‘प्रीत तुझी माझी’ या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभाकर पेंढारकर यांनी केले होते, जे दादा कोंडके यांचे खूप जवळचे मित्र होते. त्यामुळेच‘प्रीत तुझी माझी’ चित्रपटाच्या प्रीमियरला प्रमुख पाहुणे म्हणून दादा कोंडके आले होते. महेश कोठारे आणि दादा कोंडके यांची ही पहिलीच भेट होती.

Dada Kondke Birthday: ते हसवायचे, ते रडवायचे आणि खोट्याचा पर्दाफार्श देखील करायचे! ‘असे’ होते दादा कोंडके!

दादा कोंडके यांनी दिला कॉमेडीचा मंत्र!

महेश कोठारे यांना त्यांच्या पाहिल्याच चित्रपटाच्या प्रीमियरला दादा कोंडके आले, याचा खूपच आनंद झाला. अर्थात ते स्वतःला दादा कोंडके यांचे सर्वात मोठे चाहते मानतात. दादा कोंडके यांनी सुद्धा प्रीमियरनंतर महेश कोठारे यांचे काम पाहून त्यांची वैयक्तिकरित्या प्रशंसा केली आणि त्यांच्या कामाचे कौतुकही केले.तेव्हा दादा कोंडके यांनी दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांना एक महत्त्वाचा सल्ला सुद्धा दिला.दादा कोंडके म्हणाले की, ‘चित्रपटाच्या विनोदी दृश्यात कधीही दोन मिनिटांचा वेळ ठेवू नका. कारण हास्याच्या दृश्यांची सातत्यता अत्यंत महत्त्वाची आहे.’हा सल्ला महेश कोठारे यांच्यासाठी सुद्धा खूप मोलाचा ठरला आणि त्यांनी तो त्यांच्या चित्रपटांमध्येही अंमलात आणला.

महेश कोठारे यांना दादा कोंडके यांच्या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरला दादा कोंडके यांच्या उपस्थितीने त्यांना खूप आत्मविश्वास मिळाला आणि त्यांनी त्यांच्या करियरमध्ये या सल्ल्याचा फायदाही करून घेतला.

विभाग