Dada Kondake : दादा कोंडके यांना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कथा कशी सुचली? वाचा भन्नाट किस्सा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dada Kondake : दादा कोंडके यांना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कथा कशी सुचली? वाचा भन्नाट किस्सा

Dada Kondake : दादा कोंडके यांना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कथा कशी सुचली? वाचा भन्नाट किस्सा

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 19, 2024 09:27 AM IST

Dada Kondake: दादा कोंडके यांचा प्रत्येक सिनेमा हा जवळपास हिटला होता. पण 'सासरचं धोतर' हा सिनेमा फारशी कमाई करु शकला नाही. या चित्रपटाची कथा दादांना कशी सुचली चला जाणून घेऊया...

Dada Kondake
Dada Kondake

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून दादा कोंडके ओळखले जातात. त्यांचा जवळपास प्रत्येक सिनेमा हा हिट ठरला होता. तसेच या चित्रपटाची नावे हे अतिशय वेगळी असल्यामुळे प्रेक्षक लवकर आकर्षित होत असल्याचे म्हटले जात असते. दादांचा एक हटके सिनेमा म्हणजे 'सासरचं धोतर.' आता चित्रपटाचे नाव ऐकून चित्रपटात काय पाहायला मिळणार असा ही प्रश्न पडतो. चला तर मग जाणून घेऊया दादा कोंडकेंना 'सासरचं धोतर' या चित्रपटाची कथा नेमकी कशी सुचली?

सिनेमाच्या नावावरुन सुरु झाला होता वाद

अनिता पाध्ये लिखित एकटा जीव या दादांच्या आत्मचरित्रात 'सासरचं धोतर' या चित्रपटाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटाने वाद झाल्याचे देखील म्हटले आहे. माहेरची साडी हा चित्रपट दादा कोंडकेंच्या पुतण्याने म्हणजेच विजय कोंडके यांनी बनवला होता. पण तुम्हाला माहिती आहे का माहेरची साडीचे यश आणि नावापासून प्रेरित होऊन दादा कोंडेकनी सासरचं धोतर असा विनोदी चित्रपट काढला होता. मात्र या चित्रपटामुळे दादा कोंडकेंना अनेक वादांना समोर जावं लागलं होत.

कशी सुचली कथा?

'माहेरची साडी' हिट झाल्यांनतर एका पत्रकार परिषदेत बोलताना दादा गंमतीने म्हणाले की, ''काढायचंच झालं तर मी 'माहेरची साडी' काढणार नाही, 'सासरचं धोतर' काढेन.'' दादांच्या या वाक्यावर जमलेल्या लोकांनी कडाडून टाळ्या वाजवल्या होत्या. दादा हे वाक्य बोलून विसरून देखील गेले होते. मात्र काही दिवसांनी दादांचे सहकारी मुजुमदार यांनी दादांना त्याची आठवण करून दिली.. मुजुमदार म्हणाले, '' दादा, सासरचं धोतर हे टायटल चांगलं आहे. ज्या अर्थी 'माहेरची साडी' एवढ्या जोरात चालंलय, त्या अर्थी 'सासरचं धोतर' हे टायटलही लोकांच्या नक्कीच लक्षात राहील."
वाचा: 'या' मराठमोळ्या मॉडेलच्या न्यूड पोजने ९०च्या दशकात उडवली होती खळबळ, १४ वर्षे चालला खटला

दादांनाही कल्पना पटली आणि त्यांनी सासरचं धोतर या नवीन चित्रपटाची घोषणा केली. या एक दोन गोष्टी सोडल्या तर या चित्रपटाची कथेचा माहेरची साडी चित्रपटाशी तसा काहीही संबंध नव्हता. एका माणसाला त्याच्या सासऱ्याने दिलेलं धोतर खूप लकी ठरलं, म्हणून तो त्या धोतराची पूजा करू लागतो अशा विनोदी कल्पनेवर आधारीत दादांनी चित्रपटाची कथा लिहिली होती. मात्र या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दादा कोंडके आणि विजय कोंडके यांच्यात आर्थिक आणि कौटूंबिक पातळीवर अनके वाद झाले. दादा कोंडके आणि विजय कोंडके यांचं कुटुंब एकमेकांपासून दूर गेलं होत. दादांनी कसतरी घाईघाईत या चित्रपटाचं चित्रीकरण उरकलं. चित्रपटातली गाणी फार चांगली झाली नव्हती. दादादेखील पूर्वीप्रमाणे अभिनयात फारसे रंगले नाहीत. सुदैवाने या सगळ्याचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसावर फारसा परिणाम झाला नाही. चित्रपट बऱ्यापैकी चालला होता.

Whats_app_banner