शुटिंगदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शकाला दादा कोंडकेंनी खायला घातली होती बटाट्याची भाजी, वाचा किस्सा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शुटिंगदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शकाला दादा कोंडकेंनी खायला घातली होती बटाट्याची भाजी, वाचा किस्सा

शुटिंगदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शकाला दादा कोंडकेंनी खायला घातली होती बटाट्याची भाजी, वाचा किस्सा

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jun 19, 2024 02:15 PM IST

१९८८ साली एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान हा किस्सा घडला होता. दादा कोंडके यांनी चक्क बॉलिवूड अभिनेत्याला बटाट्याची पिवळी भाजी खाऊ घातली होती. चला जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं.

Dada Kondake: दादा कोंडके यांनी बॉलिवूड दिग्दर्शकाला दिली पिवळी भाजी
Dada Kondake: दादा कोंडके यांनी बॉलिवूड दिग्दर्शकाला दिली पिवळी भाजी

मराठी सिनेसृष्टीत अस्सल मातीतल्या इरसाल विनोदाने दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते म्हणजे दादा कोंडके. इतक्या वर्षांनंतरही त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यांचे सिनेमे पाहताना प्रेक्षकांची हसून लोटपोट होण्याची क्षमता आजही कायम आहे. पण एका चित्रपटाच्या वेळी दादा कोंडके यांनी चक्क बॉलिवूड दिग्दर्शकाला महाराष्ट्रीयन पद्धतीची पिवळी बटाट्याची भाजी खाऊ घातली होती. त्या दिग्दर्शकाला देखील ती आवडली होती.

दादा कोंडके यांच्या 'आगे की सोच' या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले होते. या त्यांच्या गाजलेल्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा अलीकडेच रझा मुराद यांनी एका मुलाखतीत सांगितला. त्यांनी सांगितले की दादा यांनी मला पिवळी बटाट्याची भाजी खायला घातली होती.
वाचा : 'कथेमध्ये आम्ही थोडा बदल करायचो', शाहरुख खान लेक अबरामला सांगायचा महाभारतातील कथा

काय म्हणाला दिग्दर्शक

रझा मुराद यांनी म्हटले की, "आगे की सोच" या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दादा कोंडके यांनी मला महाराष्ट्रियन पद्धतीची पिवळी बटाट्याची भाजी खायला घातली होती. त्या चवीने माझ्या मनात महाराष्ट्राची आठवण कायमची कोरली गेली आहे. दादा कोंडके यांच्या साधेपणाने आणि प्रेमाने मी मंत्रमुग्ध झालो होतो. त्यांच्या सहवासात काम करणे ही एक अविस्मरणीय अनुभव होता."
वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात, जुई गडकरीने पोस्ट करत केले आवाहन

'आगे की सोच' चित्रपटाविषयी

'आगे की सोच' हा सिनेमा १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आजही त्याचे हसूचे क्षण प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. गणपत नावाच्या साध्या आणि प्रामाणिक माणसाची कथा या सिनेमात दादा कोंडके यांनी अप्रतिम पद्धतीने मांडली आहे. आता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. २३ जून रोजी झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट हिंदी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा : कसला बॉम्ब पडलाय यार; आई-बाबा होणाऱ्या निपूण-वैदेहीची गोष्ट! 'एक दोन तीन चार'चा टीझर प्रदर्शित

दादा कोंडके यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांना हिंदीतही तितक्याच ताकदीने हसवले आहे. झी टॉकीज वाहिनी दादा कोंडके यांच्या हिंदी सिनेमांचे प्रीमियरसुद्धा प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. त्यामुळे हिंदी प्रेक्षकांनाही दादा कोंडके यांच्या विनोदी शैलीचा आनंद लुटता येईल.

Whats_app_banner