Crime Thriller Movies : रात्रीची झोप उडेल, होईल अंगाचा थरकाप! एकदा तरी नक्की बघा 'हे' क्राईम-थ्रिलर चित्रपट!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Crime Thriller Movies : रात्रीची झोप उडेल, होईल अंगाचा थरकाप! एकदा तरी नक्की बघा 'हे' क्राईम-थ्रिलर चित्रपट!

Crime Thriller Movies : रात्रीची झोप उडेल, होईल अंगाचा थरकाप! एकदा तरी नक्की बघा 'हे' क्राईम-थ्रिलर चित्रपट!

Jan 28, 2025 03:23 PM IST

Binge Watch Crime Thriller Movies : तुम्हालाही घरी बसून टीव्ही बघण्याची आवड असेल, आणि तुम्ही क्राईम-थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'या' क्राईम-थ्रिलर सीरिज आणि चित्रपट पाहू शकता.

रात्रीची झोप उडेल, होईल अंगाचा थरकाप! एकदा तरी नक्की बघा 'हे' क्राईम-थ्रिलर चित्रपट!
रात्रीची झोप उडेल, होईल अंगाचा थरकाप! एकदा तरी नक्की बघा 'हे' क्राईम-थ्रिलर चित्रपट!

Crime Thriller Movies On OTT : आपल्यापैकी अनेकजण वीकेंडला बाहेर न जाता, घरातच बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या आवडीच्या वेब सीरिज बघतात. जर, तुम्हालाही घरी बसून टीव्ही बघण्याची आवड असेल, आणि तुम्ही क्राईम-थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'या' क्राईम-थ्रिलर सीरिज सहज पाहू शकता. हे सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेले चित्रपट मनाला धक्का देतात आणि विचार करायला भाग पाडतात. तुम्हालाही या शैलीतील चित्रपट पहायला आवडत असतील, तर आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची कथा तुम्हाला नक्कीच आवडेल.

ब्रह्मयुगम

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला हा साऊथ चित्रपट 'ब्रह्मयुगम' लोकांना खूप आवडला होता. मामूटी स्टारर हा चित्रपट थ्रिल आणि रहस्याने भरलेला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली. यानंतर, जेव्हा तो ओटीटीवर प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर ते पन्न जातीतील थेवन नावाच्या लोकगायकाची ही कथा आहे. जर तुम्हाला एकाच चित्रपटात भयपट, थ्रिलर आणि सस्पेन्सचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही तो ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर पाहू शकता.

बारोट हाऊस

'बारोट हाऊस' हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे, जो २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमित साध आणि मंजिरी फडणीस मुख्य भूमिकेत दिसले होते, ज्यात त्यांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. त्याच्या कथेबद्दल बोलायचे तर, हे जोडपे आपल्या मुलांसोबत राहत असते. यामध्ये या जोडप्याच्या एका मुलाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत सापडतो, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून जातं. पुढे काय होतं याची कुणी कल्पनाही करणार नाही. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म 'झी ५'वर बघू शकता.

Chhaava Movie: 'छावा'तून छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' सीन काढून टाकणार! लक्ष्मण उतेकरांनी दिली ग्वाही

विदुथलाई २

गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सुपरस्टार विजय सेतुपतीच्या 'विदुथलाई २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली होती. पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटाचा दुसरा भाग देखील लोकांना खूप आवडला आणि राजकीय गुन्हेगारी थ्रिलर म्हणून या चित्रपटाने खूप यश मिळवले. जर तुम्ही देखील दाक्षिणात्य चित्रपट आणि विजयचे चाहते असाल, तर तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. या चित्रपटात एका पोलीस हवालदाराचा एका फुटीरतावादी गटाच्या नेत्याशी झालेला संघर्ष दाखवण्यात आला आहे.

जॉनी गद्दार

२००७मध्ये रिलीज झालेला 'जॉनी गद्दार' हा एक थ्रिलर कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये नील नितीन मुकेश, धर्मेंद्र यांच्यासह अनेक स्टार्स एकत्र दिसले होते. नीलचा हा पहिला चित्रपट श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला आहे. 'जॉनी गद्दार' ही बेकायदेशीर कामे करणाऱ्या पाच लोकांची कथा आहे. त्यांच्यात एक करार होतो, ज्याच्या बदल्यात त्यांना अडीच कोटी रुपये मिळणार आहेत. विक्रमला (नील मुकेश) ही रक्कम एकट्याने हडप करायची आहे, जेणेकरून तो त्याच्या मैत्रिणीसोबत आनंदी जीवन जगू शकेल. तो त्याच्या टोळीचा विश्वासघात करतो. पुढे काय होते हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

मंकी बॅग

'मंकी बॅग' हा २०१७ साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे, जो तमिळ भाषेत बनला आहे. या चित्रपटाचे खरे नाव 'कुरंगू बोम्मई' आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, एक पिता-पुत्र एक प्राचीन मूर्ती आणि पैशांनी भरलेली बॅग तस्करी करताना दिसले आहेत. जर, तुम्हाला या क्राईम-थ्रिलरचे हिंदी डब पहायचे असेल, तर तुम्ही ते झी५वर पाहू शकता.

Whats_app_banner