Crime Patrol Actress: टीव्हीवरील प्रसिद्ध क्राइम बेस्ड शो 'क्राइम पेट्रोल'मध्ये समाजात घडणारे गुन्हे दाखवले जातात. ही मालिका सत्य घटना आणि गुन्ह्यांवर आधारित आहे. त्यात काम करणाऱ्या कलाकारांचा मुख्य उद्देश लोकांना गुन्हेगारीविषयी सावध करणे आणि त्यांना गुन्हेगारीची जाणीव करून देणे हा असतो. पण जेव्हा जागरुक लोक गुन्हे करू लागतील, तेव्हा सर्वांसाठीच ते चकीत करणारे असतात. या मालिकेत म्हणजेच 'क्राइम पेट्रोल'मध्ये काम करणारी अभिनेत्री शबरीनने असा घोटाळा केला, ज्यानंतर ती तुरुंगात पोहोचली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, 'क्राइम पेट्रोल' मालिकेत काम करणारी शबरीन ब्रजेश सिंग नावाच्या तरुणाच्या प्रेमात होती. त्यांचे प्रेमप्रकरण बराच काळ चालले. पण ब्रजेशच्या घरच्यांचा या नात्याला विरोध होता. त्यामुळे त्याने लग्न करण्यास नकार दिला होता. हे ऐकून शबरीनला धक्का बसला होता. तिने ब्रजेश आणि त्याच्या कुटुंबाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. शबरीनने ब्रजेशचा साडेतीन वर्षांचा पुतण्या प्रिन्सचे अपहरण केले. मुलगा बेपत्ता होताच संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झाले होते.
मुलगा बेपत्ता होताच ब्रजेशच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. यानंतर पालघर जिल्हा पोलिसांनी शबरीनला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स शनिवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. सकाळी अकराच्या सुमारास शबरीन तेथे पोहोचली आणि औषध घेण्याच्या बहाण्याने त्याला घेऊन गेली.
वाचा: प्रसिद्ध अभिनेत्रीचा खासगी MMS लीक, १७ सेकंदांच्या व्हिडीओने माजली खळबळ
वालीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेशचा पुतण्या प्रिन्स नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. शनिवारी तो शाळेत गेला होता. सकाळी ११ च्या सुमारास शबरीन त्याच्या शाळेत पोहोचली आणि औषध घेण्याच्या बहाण्याने त्याला घेऊन गेली. प्रिन्स तिला आधीच ओळखत असल्याने कोणताही विचार न करता शबरीनसोबत निघून गेला. पण बराच वेळ मुलगा घरी न पोहोचल्याने कुटुंबीय अस्वस्थ झाले आणि त्यांनी चौकशी केली असता शबरीनचे नाव पुढे आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे शबरीनचा शोध घेऊन प्रिन्सची नायगाव येथील फ्लॅटमधून सुटका केली.
संबंधित बातम्या