कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

Published May 05, 2024 08:31 AM IST

गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०२३मध्ये मुंबईत शूटिंग संपल्यानंतर बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले होते.

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’
कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

कोव्हिड-१९मुळे जगभरात सर्वाधिक सायलेंट हार्ट अटॅक येत असल्याचे अनेक अहवाल सांगत आहेत. लोक आता अधिक चिंतित आहेत. कारण, AstraZeneca ने म्हटले आहे की ‘Covishield’ लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०२३मध्ये मुंबईत शूटिंग संपल्यानंतर बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले होते. त्याचवेळी, आता श्रेयसने हृदयविकाराचा झटका आल्याचा अनुभव सांगताना काही मोठ्या गोष्टींचा उलगडा केला आहे. श्रेयसला विचारण्यात आले की, त्याच्या हृदयविकाराचा कोरोना लसीशी संबंध असू शकतो का? यावर अभिनेत्याने काय उत्तर दिले ते जाणून घेऊया...

अभिनेता श्रेयस तळपदे याने नुकतीच एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितले. श्रेयस तळपदे म्हणाला की, 'मी स्वत:ला खूप घाबरलो होतो. हे दुर्दैवी आणि अनपेक्षित होते. मला खात्री होती की मी माझा आहार, व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेत आहे. अर्थात, लसीबद्दलही काही सिद्धांत आहेत. आपण त्याबद्दल ऐकत आलो आहोत. लोक बाहेर काम करत आहेत किंवा खेळत आहेत आणि अचानक त्यांना अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागतं. अगदी स्वत:ची काळजी घेणाऱ्या व्यक्तीलाही काहीतरी होतं.’

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

'मी मद्यपान करत नाही, मी धूम्रपान करत नाही...'

हृदयविकाराच्या घटनेचे कारण सांगताना श्रेयस तळपदे म्हणाला की, 'मी सिगारेट ओढत नाही. मी नियमितपणे मद्य पीत नाही. मी महिन्यातून एकदा किंवा दोनदा प्यायलो तर तेही मर्यादेत... तंबाखू खात नाही. होय, कोलेस्टेरॉल किंचित वाढलेले असते. पण मला सांगण्यात आलेले की, आता तेही सामान्य आहे. आणि त्यासाठी मी औषधही घेत होतो, त्यामुळे ते कंट्रोलमध्ये आलं होतं. मधुमेह नसेल, रक्तदाब नसेल तर दुसरे कोणते कारण असू शकते? मी पूर्णपणे सावध होतो.’

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला का?

हृदयविकाराच्या झटक्याला लस कारणीभूत आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना श्रेयस तळपदे म्हणाला की, 'मला हा सिद्धांत नाकारणं योग्य वाटत नाही. कोरोना लसीनंतरच मला थोडा थकवा जाणवू लागला. यात काही तरी तथ्य असावे. हा सिद्धांत आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही. कदाचित हे कोरोनामुळे झाले असेल किंवा लसीमुळे, मला माहित नाही. पण, त्याचा काही ना काही संबंध असावा. कारण, कोरोनानंतरच मला हे सर्व जाणवायला लागले.’

खेळता खेळता लोक पडत आहेत!

यानंतर श्रेयस म्हणाला, 'खरं सांगायचं तर आपण आपल्या शरीरात काय टाकलंय हेच कळत नाही. सगळे सांगत होते तेच आपण केले. मोठ्या कंपन्यांवर विश्वास ठेवला. कारण, अशा घटना आपण याआधी ऐकल्या नव्हत्या. कोरोनानंतरच अशा बातम्या आणि व्हिडीओ सतत दिसू लागले. लोक खेळताना पडत होते आणि त्याचे खरे कारण समोर येत नव्हते. त्यामुळे हे खूपच भीतीदायक आहे.’

Whats_app_banner