टीव्ही मालिकांमध्ये पोस्टर झळकावून छुपा प्रचार? स्टार प्रवाह वाहिनी आणि शिंदे सेनेच्या विरोधात तक्रार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  टीव्ही मालिकांमध्ये पोस्टर झळकावून छुपा प्रचार? स्टार प्रवाह वाहिनी आणि शिंदे सेनेच्या विरोधात तक्रार

टीव्ही मालिकांमध्ये पोस्टर झळकावून छुपा प्रचार? स्टार प्रवाह वाहिनी आणि शिंदे सेनेच्या विरोधात तक्रार

Nov 15, 2024 05:57 PM IST

Election 2024 Violation of Code of Conduct : ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या मालिकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रचार करणारी पोस्टर्स दाखवली गेली आहेत.

Eknath shinde : एकनाथ शिंदे
Eknath shinde : एकनाथ शिंदे

Violation of Code of Conduct : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी छुप्या पद्धतीने पोस्टर्स दाखवली आहेत, असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सांवत यांनी केला आहे. यावर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. सचिन सावंत यांच्या म्हणण्यानुसार, स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या मालिकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रचार करणारी पोस्टर्स दाखवली गेली आहेत.

शिवसेना पक्षाच्या या पोस्टर्सचा समावेश काही भागांमध्ये अंशत: असा करण्यात आला आहे की, ते पक्षीय प्रचाराच्या रूपात दिसत आहेत. विशेष म्हणजे, या पोस्टर्सचा समावेश १३ नोव्हेंबर आणि १४ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागांमध्ये देखील करण्यात आला, असे सावंत यांनी सांगितले. ‘मालिकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची पोस्टर्स दाखवून छुप्या पद्धतीने प्रचार करण्याची क्लुप्ती अवलंबलेली आहे. हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून निवडणूक आयागाने याची गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करून कारवाई करावी’, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सांवत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

गद्दार म्हणताच मुख्यमंत्री शिंदेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली, गाडीतून उतरले अन् तडक महाआघाडीच्या कार्यालयात शिरले!

तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन

सदर घटना गंभीर असून निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय झाल्याने तात्काळ कारवाई करु असे आश्वासन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सावंत यांना दिले आहे असे सावंत म्हणाले. यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन सचिन सावंत यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सावंत पुढे म्हणाले की, स्टार प्रवाह वाहिनी वरील मालिकांच्या कंटेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची जाहिरात करणारी पोस्टर्सचे चित्रिकरण दाखवण्यात आलेले आहे. एक दृष्यातून दुसऱ्या दुष्ट्यात जाताना मध्येच अशी पास्टर्स दाखवण्यात आलेली आहेत.

कोणत्या मालिकांमध्ये दिसले पोस्टर?

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या भागात तसेच १४ तारखेला दुपारी १२ वाजता आणि ४ वाजता पुनःप्रक्षेपण भागातही ही पोस्टर्स दाखवण्यात आलेली आहेत. याच वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ व इतर मालिकांमध्येही अशाच छुप्या पद्धतीने जाहिरातबाजी केलेली आहे. परंतु, डिस्ने हॉस्टस्टार या त्यांच्याच ओटीटी प्लॅटफार्मवरील मालिकांमध्ये मात्र ही पोस्टर्स दाखवलेली नाहीत. आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून कदाचित ही लपावछपवी केली असावी. या पोस्टरबाजीसाठी शिवसेनेकडून वाहिनीला अधिकृत रक्कम दिली आहे का, आणि नसेल तर हा काळ्या पैशाचा व्यवहार आहे, आर्थिक गुन्हे शाखेनेही याची दखल घेऊन चौकशी करावी, असे सावंत म्हणाले.

Whats_app_banner