मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi Serial Updates : कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कोणती नवी मालिका येणार?

Marathi Serial Updates : कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कोणती नवी मालिका येणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 13, 2024 08:21 PM IST

Colors Marathi Serial Update: कलर्स मराठी वाहिनीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता ही लोकप्रिय मालिका कोणती हे जाणून घेऊया...

New Marathi Serial
New Marathi Serial

Colors Marathi New Serial: गेल्या काही दिवसांपासून मालिका विश्वात खळबळ पाहायाला मिळत आहे. अनेक जुन्या लोकप्रिय मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत तर काही मालिका थेट बंद करण्यात आल्या आहेत. या बंद करण्यात आलेल्या मालिका एकेकाळी टीआरपी यामध्ये चांगले स्थान पटकावून होत्या. आता याच मालिकांचा टीआरपी घरल्यामुळे निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील देखील मालिक बंद होणार असल्याचे समोर आले आहे.

नव्या मालिकांची घोषणा

कलर्स मराठी वाहिनीवर 'इंद्रायणी' आणि 'सुख कळले' या दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत. 'इंद्रायणी' ही मालिका २५ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 'सुख कळले' या मालिकेची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेची वेळ आणि प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सागर देशमुख छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तर स्पृहा जोशी देखील जवळपास सात ते आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा मालिका विश्वात दिसणार आहे. पण या दोन्ही मालिकांमुळे जुन्या कोणत्या मालिकांना निरोप घ्यावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: फक्त चौघांनाच शेवटच्या दिवसाची कल्पना, 'चला हवा येऊ द्या'च्या टीमला धक्का

कोणती मालिका घेणार निरोप?

'इंद्रायणी' ही मालिका २५ मार्च पासून 'सिंधुताई माझी माई' या मालिकेच्या वेळेत सुरु होणार आहे. त्यामुळे 'सिंधुताई माझी माई' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या मालिकेतील कथानकाचा बराचसा भाग अपूर्ण अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे ही मालिका निरोप घेणार की वेगळ्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे कोडं उलघडलेले नाही. 'भाग्य दिले तू मला' ही मालिका रेंगाळली असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालिकेचे कथानक वाढवण्यापेक्षा त्याचा शेवट गोड होणार असल्याची चर्चा आहे. 'भाग्य दिले तू मला' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री साडे नऊ वाजता टेलिकास्ट होते. तर दुसरीकडे, 'रमा राघव' मालिकेत लग्नाची लगबग सुरू आहे. त्यामुळे ही मालिका देखील निरोप घेणार का? या चर्चेलाही जोर आला आहे. ही मालिका रात्री नऊ वाजता प्रसारीत होते.
वाचा: शिल्पा शेट्टीच्या लावणीने जिंकली उपस्थितांची मने, पाहा व्हिडीओ

ट्रेंडिंग न्यूज

आई कुठे काय करते वेगळ्या वेळेत

टीआरपी यादीत अनेकदा पहिल्या-दुसऱ्या स्थानवर असलेली 'आई कुठे काय करते' ही मालिका कंटाळवाणी झाल्याची भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली होती. तसेच टीआरपी यादीमधील या मालिकेच स्थान घसरल्यामुळे आता ही मालिका दुपारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे ७ वाजता दुसरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

WhatsApp channel