मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Antarpat Serial:'गौतमीच्या मैत्रीने खुलणार क्षितिजचे जीवन', 'अंतरपाट' मालिकेत रंजक वळण

Antarpat Serial:'गौतमीच्या मैत्रीने खुलणार क्षितिजचे जीवन', 'अंतरपाट' मालिकेत रंजक वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 02, 2024 01:11 PM IST

Antarpat Serial Update: 'अंतरपाट' ही कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झालेली नवी मालिका आहे. या मालिकेत आता काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Antarpat: 'अंतरपाट' मालिका
Antarpat: 'अंतरपाट' मालिका

कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' या लोकप्रिय मालिकेत गौतमी आणि क्षितिजचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पारंपरिक पद्धतीने पार पडला आहे. त्यांचा विवाह विशेष सोहळा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या विशेष सोहळ्यानंतर त्यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच क्षितिज गौतमीला त्याचं जान्हवीवर प्रेम असल्याचं सत्य सांगणार आहे, तर दुसरीकडे आता त्यांच्या नात्यातील नवा अध्याय सुरू होणार आहे. दोघांमध्ये मैत्रीचं नातं फुलणार आहे.

गौतमीने धीर सोडलेला नाही

'अंतरपाट' मालिकेत क्षितिजचं गौतमीसोबत लग्न झालेलं असलं तरी त्याच्या मनात अजूनही पूर्वीची प्रेयसी जान्हवीची जागा कायम आहे. जान्हवीचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही, हे त्याच्या मनात पक्के आहे. तरीसुद्धा, गौतमीने या नात्यात मैत्रीचे बीज पेरण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच क्षितिजने सत्य सांगितल्यानंतरही गौतमीने धीर सोडलेला नाही.
वाचा: अशोक सराफ यांचा अनोखा लूक, 'लाईफलाईन' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

गौतमीने बजावले आपले कर्तव्य

गौतमी आणि क्षितिजच्या मैत्रीचे नाते त्यांच्या आयुष्यात एक नवा रंग भरणार आहे. गौतमीने क्षितिजला दिलेला हा मैत्रीचा हात त्यांच्या नात्याला एक नवी दिशा देणार आहे. गौतमी आणि क्षितिज लग्नबंधनात अडकल्याने त्यांच्यात पती-पत्नीचे नाते निर्माण झाले आहे. पण त्यासोबत ते इतर नात्यांतही अडकले आहेत. ही सगळी नाती जपणे गौतमी आपले कर्तव्य मानते. तिने अत्यंत सकारात्मक पद्धतीने या लग्नाचा स्वीकार केलेला मालिकेत पाहायला मिळेल.
वाचा: डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात 'हे' हिंदी चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

ट्रेंडिंग न्यूज

गौतमी आणि क्षितिजच्या नात्यातील हे नवे वळण प्रेक्षकांना नक्कीच भावेल. त्यांच्या या नव्या, सुंदर नात्याची झलक 'अंतरपाट' या मालिकेत पाहायला मिळत आहे. आता या मालिकेत नवे वळण आहे. गौतमी आणि क्षितिजमध्ये चांगली मैत्री झाली आहे. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: १२ वर्षांचं प्रेम आणि वाचवायला फक्त ५ तास, 'विषय हार्ड'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

WhatsApp channel