Bigg Boss Marathi: अंकिता वालावलकरने केली निक्कीची नक्कल, जाणून घ्या नेमकं काय झालं दोघींमध्ये
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi: अंकिता वालावलकरने केली निक्कीची नक्कल, जाणून घ्या नेमकं काय झालं दोघींमध्ये

Bigg Boss Marathi: अंकिता वालावलकरने केली निक्कीची नक्कल, जाणून घ्या नेमकं काय झालं दोघींमध्ये

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 31, 2024 03:44 PM IST

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्की तांबोळी अंकिता वालावलकरशी भांडताना दिसत आहे. तिला घरातून बाहेर काढण्यासाठी निक्की प्रयत्न करत आहे.

Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5

'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी काय वादळ येईल हे सांगू शकत नाही. सोशल मीडिया गाजवणारी मालवणी चेडू अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात धमाका करताना दिसून येत आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरला निक्की तांबोळी यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले आहे. दरम्यान, अंकिताने निक्कीची नक्कल केली आहे. पण हा सगळा वाद कशामुळे झाला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

बिग बॉस मराठीच्या घरात पहिला नॉमिनेशन टास्क पार पडला. पहिल्या टास्कदरम्यान 'बिग बॉस'ने ज्यांच्याकडे स्वत:ची स्टॅटर्जी नाही...दुसऱ्यांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात अशा सदस्यांना नॉमिनेट करण्यास सांगितले आहे. त्या टास्कमध्ये अंकिताला देखील नॉमिनेट करण्यात आले. पण देण्यात आलेला टास्क पार पडत असताना निक्की तंबोळी सतत अंकिताच्या मध्ये येत होती. शेवटी रागात अंकिता तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करते. तरी देखील ती ऐकत नाही. अंकिता निक्कीची नक्कल करते. ते पाहून निक्कीला आणखी राग अनावर होतो. निक्की आणखी जोर लावून तिच्या पुढ्यात उभी राहाते. त्यामुळे अंकिता रडू कोसळते. आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात अंकिता रडत बसणार की सदस्यांना कोकणी हिसका दाखवणार हे पाहावे लागेल.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अंकिता निक्कीला म्हणते,"मला तुझ्यासोबत पाडापाडीचं काही खेळायचं नाही. तू माझ्यापासून लांब राहा". त्यावर निक्की तिला म्हणते,"तू दूर जा...माझी मर्जी..तुला मला उचलून घ्यायचंच नाही आहे". पुढे अंकिला तिला उचलून घेत म्हणते,"तुला आता मी असं उचलून घेऊ का?". अंकिताने उचलून घेतल्याने निक्कीला राग येतो आणि ती म्हणते,"माझे हात पाहायचे आहेत का तुला कसे चालतात... परत हात लावलास तर तुझं तोंड मी खलबत्त्याने ठेचेल". त्यानंतर अंकिता सर्व सदस्यांपासून दूर जाते आणि ढसाढसा रडते.
वाचा: 'गुलिगत' सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू-वालावलकरने रितेश देशमुखसमोर गाऱ्हाणं घालत 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रवेश केला होता. पण हा मालवणी चेडू पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झाला आहे. आता अंकिता वालावलकरचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास संपणार की पुढे सुरू राहणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. तसेच ती निक्कीला काय इंगा दाखवणार हे देखील पाहण्यासारखे आहे.

Whats_app_banner