'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता आणि सागर यांची छान अशी लव्हस्टोरी सुरु आहे. पण प्रत्येक मालिकेत एक तरी खलनायिका असते. त्याच प्रमाणे या मालिकेत सावनी ही सतत षडयंत्र रचणारी, स्वत:च्या चुकांना इतरांना दोष देणारे पात्र आहे. साधी, सरळ मुक्ता तिला मदत करत असते. पण ती कधीच मुक्ताला चांगले बोलत नाही. चला पाहूया 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय होणार...
मुक्ता सगळ्यांसाठी मासे बनवते. त्यामुळे संपूर्ण कोळी कुटुंबीय आनंद असते. इंद्रा तर मुक्ताला डोक्यावर घेऊन नाचायची बाकी असते. संपूर्ण कोळी कुटुंबीय आनंद साजरा करत असताना सईला आयस्क्रीम खात असण्याची इच्छा होते. मुक्ता सईसाठी आयस्क्रीम मागवणार असते पण पाऊस पडत असल्यामुळे मिळत नाही. शेवटी सागर सईला घेऊन जातो आयस्क्रीम खायला. पण जाताना सागर मोबाईल चार्जिंगला लावून जातो.
हॉटेलमधून सावनीला पैसे नसल्यामुळे हकलून देण्यात आले. ती दारुच्या नाशेत कचऱ्याजवळ जाऊन बसते. आदित्य तेथे पोहोचतो त्याला काही सुचेनासे झाले आहे. त्यामुळे तो सागरला फोन करतो. सागर घरात नसल्यामुळे मुक्ता फोन उचलते. तिला सगळं कळाल्या बरोबर ती पळत जाते आणि आदित्य-सावनीला घरी घेऊन येते. तेव्हाही सावनी फक्त आणि फक्त मुक्ताला दोष देत असते. पण आता पैसे नसल्यामुळे सावनी काय नवा डाव खेळणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
वाचा : 'तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते', उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा
सावनीकडे पैसे नसल्यामुळे ती एका चाळीत खोली पाहाते. ती आदित्यला घेऊन तिथे राहायला जाणार असते. ती सागरला धमकी देते की मी जाते आदित्यला घेऊन चाळीत राहायला. एवढं सगळं झाल्यानंतरही सावनीचे वागणे काही सुधारत नाही. ती आदित्यची ढाल करुन सागरला इमोशनली ब्लॅकमेल करते. शेवटी सागर तिला घरात राहण्याची परवानगी देतो. तरीही सावनीची आरेरावी जात नाही. यावेळी मुक्ता मात्र तिच्यासमोर ठामपणे उभी आहे. माझ्या घरात राहायचं तर माझ्या पद्धतीने. आता मालिकेत पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच सागर या सगळ्यावर काय तोडगा काढणार हे देखील पाहायला मिळणार आहे.