सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नव्या मालिकांना प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. आता कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका येत आहे. या मालिकेचे नाव 'दुर्गा' असे आहे. या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोने प्रेक्षकांची मने जिंकली असून सर्वजण मालिकेची आतुरतेने वाट पाहात आहेत. चला जाणून घेऊया मालिका कधी आणि किती वाजता प्रदर्शित होणार आहे...
'दुर्गा' या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आपल्या कुटुंबाचं सुख हिरावून घेतलेल्या माणसाचा बदला घेण्यास निघालेल्या एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट प्रेक्षकांना 'दुर्गा' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ज्या घराचा उंबरठा तिने ओलांडला आहे, त्यांच्याच विरोधात आपल्याला लढायचं आहे हे कळल्यानंतर दुर्गा कसा मार्ग काढणार हे जाणून घेण्यासाठी मालिका पाहावी लागणार आहे.
'दुर्गा' या मालिकेत दुर्गाच्या भूमिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे झळकणार असून मालिकेचा नायक अभिषेकची भूमिका अंबर गणपुले साकारणार आहे. तसेच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसतकर आणि वृंदा गजेंद्र देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. ही नवी कोरी गोष्ट ‘दुर्गा’ २६ ऑगस्टपासून संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संदीप खरे यांची लेक रुमानी खरे हिने अभिनयाचे धडे घेतले आहेत. तिने यापूर्वी काही नाटकांमध्ये काम केले आहे. तिने रंगभूमी गाजवली होती. आता ती मालिकेत दिसणार असल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत. रुमाली ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती सतत वडिलांसोबत फोटो शेअर करताना दिसते. तिने ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत राधा ही भूमिका साकारली होती.
वाचा : " आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका ", रितेशने बिग बॉसच्या घरात घेतली चांगलीच शाळा
'दुर्गा' या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुख आणि सूड अशा द्वंद्वात अडकलेली, आपल्या कुटुंबासाठी सर्वकाही पणाला लावून त्यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या दुर्गावर आधारित ही मालिका आहे. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध दुर्गा कशी घेणार हे जाणून घेणे उत्सुकतेचे असणार आहे.