मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
May 02, 2024 07:47 AM IST

सध्या मालिका विश्वात वेगवेगळ्या मालिकांचा धुमाकूळ सुरु आहे. अशातच 'तुला पाहते रे' या मालिकेतील अभिनेत्री छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याचे दिसत आहे.

'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित
'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहाते रे' या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या मालिकेत सुबोध भावे, अभिज्ञा भावे, गायत्री दातार, शिल्पा तुळसकर, आशुतोष गोखले, सोनल पवार, गार्गी फुले, संदेश जाधव हे कलाकार दिसले होते. या मालिकेवर आणि मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते. पण अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेतील अभिनेत्री पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कलर्स मराठी वाहिनीवर सध्या एका पाठोपाठ एक अशा नव्या मालिका सुरु होताना दिसत आहेत. ही वाहिनी टीआरपी यादीमध्ये देखील मागे पडली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नव्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा वाहिनीचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.
वाचा: सरोजने कलासाठी आखला मोठा डाव, अद्वैतला कळताच काय होणार 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत

कोणती आहे नवी मालिका?

काही दिवसांपूर्वी 'अबीर गुलाल' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता कलर्स मराठीकडून मालिकेचा दुसरा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्या प्रोमोमध्ये रुग्णालयात दोन बाळांची अदलाबदल होताना दिसली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबात उत्सुकता निर्माण झाली. आता या मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: कार्तिकने घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यास दिला नकार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असणार सागरचे पुढचे पाऊल

'अबीर गुलाल' मालिकेचा नवा प्रोमो

'अबीर गुलाल' मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये मालिकेत कोणते कलाकार दिसणार हे स्पष्ट करण्यात आले आहे. अभिनेत्री गायत्री दातार ही या मालिकेत शुभ्रा हे पात्र साकारणार आहे. शुभ्रा ही अतिशय श्रीमंत कुटुंबातून आली आहे. तिला काळा हा रंग अजीबात आवडत नाही. आता त्यामागे काय कारण आहे हे मालिकेच्या आगामी भागात कळेल. तर दुसरीकडे अभिनेत्री पायल जाधव ही श्रीची व्यक्तीरेखा साकारताना दिसत आहे. ती दिसायला थोडी सावळी असल्यामुळे तिच्या वडिलांवर तिच्यावर राग आहे. तरीही ती स्वत:च्या शरीराकडे सकारात्मपणे पाहात असल्याचे दिसत आहे.
वाचा: चित्रपट पाहण्याचा विचार करत आहात? मग हे दोन मराठी सिनेमे चांगला पर्याय ठरु शकतात

पायल जाधवचे मालिकेत पदार्पण

अभिनेत्री पायल जाधव या मालिकेच्या माध्यमातून टीव्ही विश्वात पदार्पण करत आहे. तिची ही पहिलीच मालिका आहे. तिने यापूर्वी ‘बापल्योक’ या चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच गायत्री दातार देखील या मालिकेच्या माध्यमातून पुनरागम करत असल्यामुळे सर्वांना या मालिकेची उत्सुकता पाहायला मिळते.

IPL_Entry_Point

विभाग