मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  "दोन मनाच्या दोन दिशा अन एक हळवी वाट...", ‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत ऐकलेत का?

"दोन मनाच्या दोन दिशा अन एक हळवी वाट...", ‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत ऐकलेत का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 05, 2024 02:20 PM IST

‘अंतरपाट’ ही नवी मालिका लवकरच सुरु होणार आहे. नुकताच या मालिकेते शीर्षकगीत प्रदर्शित झाले असून सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे.

Aantarpaat Serial: ‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत
Aantarpaat Serial: ‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत

मराठी मालिकांची शीर्षकगीते ही कायमच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसतात. 'आभाळमाया', 'वादळवाट' आणि इतर काही मालिका प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी त्यांची गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. आता यामध्ये आणखी मालिका सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 'अंतरपाट' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे शीर्षकगीत नुकताच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘अंतरपाट’ मालिकेविषयी

सध्या मालिका विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. यामध्ये कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अंतरपाट’ या मालिकेचा देखील समावेश आहे. ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतेच या मालिकेचे शीर्षकगीत कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम ,युट्यूब आणि फेसबुक पेजवर प्रदर्शित झाले आहे. हे गीत ऐकता क्षणी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण करणारे आहे. ‘अंतरपाट’ ही मालिका १० जून पासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
वाचा: अभिनेत्री अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडेचे झाले अपहरण? काय आहे प्रकरण जाणून घ्या

काय आहे शीर्षकगीता

‘अंतरपाट’ मालिकेच्या शीर्षकगीताचे "दोन मनाच्या दोन दिशा अन एक हळवी वाट.." असे बोल आहेत. या शीर्षकगीताला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून रसिक भरभरून प्रेम करत आहेत. यात गौतमीच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगत आहे. तर क्षितीजच्या मनात घालमेल सुरु असल्याचे दिसत आहे. काय असेल क्षितीजच्या मनात? का आणि कशासाठी असे टोकाचे पाऊल उचलले असेल? असे अनेक प्रश्न हे शीर्षकगीत पाहून मनात येत असतील तर याची उत्तरे आपल्याला लवकरच मिळणार आहेत.
वाचा: अभिनेते अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून आवाज का देतात? जाणून घ्या

‘अंतरपाट’ मालिकेच्या शीर्षकगीताविषयी

प्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि सावनी रवींद्र यांच्या मधुर आवाजाने हे शीर्षकगीत अधिकच श्रवणीय बनले आहे. निषाद गोलंबरे यांनी या गीताला सुरेल संगीत दिले असून, वैभव जोशी यांच्या अत्यंत भावपूर्ण शब्दांनी हे गाणे सजले आहे. या गीताने नक्कीच प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले असून प्रत्येकाच्या मनाला भिडणारे आणि हृदयाला स्पर्शून जाणारे हे गीत आहे. ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात 'अंतरपाट' मालिकेबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.
वाचा: निकालापूर्वीच 'या' खानने केले पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन, पोस्ट व्हायरल

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग