मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Spruha Joshi: स्पृहा जोशीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, दिसणार ‘या’ मालिकेत

Spruha Joshi: स्पृहा जोशीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, दिसणार ‘या’ मालिकेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 12, 2024 06:05 PM IST

Spruha Joshi Upcoming Serial: स्पृहा जोशीच्या आगामी मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Spruha Joshi Sukh kalale
Spruha Joshi Sukh kalale

colors marathi new serial: मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय क्युट आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या दमदार अभिनयासोबत स्पृहा तिच्या कवितांमुळेही नेहमीच चर्चेत असते. लहानपणापासूनच तिला कलेची आवड होती. स्पृहाने सूत्रसंचालनाच्या क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण केला आहे. लवकरच स्पृहा एका एका मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्पृहा महत्त्वाच्या भूमिकेत असणारी ही आगामी मालिका म्हणजे “सुख कळले.” कलर्स मराठी वाहिनीवर ही नवी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचा प्रोमो कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसंच स्पृहा बरोबर गुणी आणि चोखंदळ अभिनेता सागर देशमुख असणार आहे.
वाचा: ऑस्कर न मिळवणाऱ्यांसाठी बम्पर गिफ्ट! १.४ कोटींच्या ‘गुडी बॅग’ मध्ये नेमकं काय?

“सुख कळले” मालिकेच्या प्रोमोमध्ये स्पृहा जोशी ही एका रिक्षामधून उतरते. तिच्यासोबत सागर देशमुख असतो. दोघेही रमतगमत चालत असताना अचानक स्पृहाची चप्पल तुटते. सागर त्याच्या पायातली चप्पल काढून स्पृहाला घालायला देतो आणि तिच्या चप्पल एका हातात घेतो. स्पृहा सागरच्या खांद्यावरची बॅग घेते. एकंदरीत स्पृहा आणि सागरचा सुखी संसार “सुख कळले” या मालिकेत दिसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या मालिकेच्या प्रोमोची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
वाचा: ती नाचण्याची जागा नाही; नोराचा मेट्रोमधील 'सैराट'वर डान्सपाहून नेटकरी संतापले

सध्या तरी “सुख कळले” ही मालिका कधी सुरु होणार, हे गुलदस्त्यात असले तरी या पहिल्याच सुंदर टीजरने रसिकांना सुखद धक्का दिला असून प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. स्पृहा जोशी आणि सागर देशमुख हे दोन्ही तगडे कलाकार प्रथमच एकत्र येत असून ही दमदार जोडी लोकांच्या पसंतीस उतरते आहे. “सुख कळले” ही एक वास्तवदर्शी मालिका असून स्पृहा- सागर आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवायला पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. प्रोमोमधील तरल भावस्पर्शी क्षण या दोघांमधील नाते अधोरेखित करत आहे. त्यामुळे ही एक मध्यमवर्गीय कुटुंबाची हृदयस्पर्शी कहाणी असून जी प्रेक्षकांना तुफान भावते आहे.
वाचा: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला जावई बनण्यास बोनी कपूरचा नकार?

यापूर्वी स्पृहा ‘लोकमान्य’ या मालिकेत काम करत होती. तिने या मालिकेत ‘सत्यभामा’ ही भूमिका साकारली होती. पण मालिकेचा टीआरपी वाढत नसल्यामुळे अचानक ही मालिका बंद करण्यात आली. आता स्पृहा पुन्हा छोट्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाली आहे.

WhatsApp channel