मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

Aarti Vilas Borade HT Marathi
May 12, 2024 10:53 AM IST

सध्या अनेक नवनव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अशातच कलर्स मराठी वाहिनीवरील वर्षभरापूर्वीच सुरु झालेली एक मालिका बंद होत असल्याचे समोर आले आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

मालिका विश्वामध्ये सध्या नव्या मालिकांचा अक्षरश: धुमाकूळ सुरु आहे. एका पाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या विषयावर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मालिकेत येणारे ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात चांगलेच यशस्वी होत आहेत. पण काही मालिका टीआरपी यादीमध्ये येत नसल्यामुळे निर्मात्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कलर्स मराठी वाहिनीवरील एक मालिका बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कलर्स मराठी वाहिनीवर देखील नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘अंतरपाट’ आणि ‘अबीर गुलाल’ या दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली. या मालिकांच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पण, या मालिकांमुळे जुन्या एका मालिकेला वर्षभरातच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला आहे. या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेला निरोप दिला आहे.
वाचा: “लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?”, केतकी चितळेची संतप्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

कोणती मालिका होणार बंद?

मालिका या टीआरपी यादीमध्ये काम करत नसल्यामुळे निर्माते त्या बंद करण्याच्या मागे लागतात. आता कलर्स मराठी वाहिनीवर दोन नव्या मालिकांची घोषणा होताच जुनी मालिका बंद होणार असल्याचे समोर आले आहे. या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ही मालिका 'काव्यांजली' आहे. या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारे कलाकार करिश्मा आणि पियुष रानडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
वाचा: विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या 'श्रीकांत'ची पहिल्या दिवसाची कमाई

काय आहे कलाकारांची पोस्ट?

पियुषने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो मेकअप रुममध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने 'विश्वजीत म्हणून शेवटचे काही दिवस.. सर्वांचे खूप खूप आभार' असे कॅप्शन दिले आहे. तर करिश्माने देखील इन्स्टा स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने “काव्या म्हणून शेवटचे काही दिवस” असे म्हटले आहे. त्यामुळे वर्षभरातच ‘काव्यांजली- सखी सावली’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
वाचा: प्रत्येक 'चौका'तला राडा प्रेक्षकांना पाहाता येणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे?

मालिकेविषयी जाणून घ्या

‘काव्यांजली- सखी सावली’ ही मालिका गेल्यावर्षी २९ मे २०२३ रोजी सुरु झाली होती. सुरुवातीला या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण गेल्या काही महिन्यांपासून मालिका टीआरपी यादीमध्ये खाली गेल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेण्याचे ठरवले आहे. वाहिनीने अद्याप याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच कलर्स मराठी वाहिनीवर ‘अबीर गुलाल’ आणि ‘अंतरपाट’ या दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग