Indrayani: गोविंदा रे गोपाळा! 'इंद्रायणी' मालिकेत दहीहंडीचा उत्साह; इंदू फोडणार दहीहंडी-colors marathi indrayani serial 25th august 2024 update ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Indrayani: गोविंदा रे गोपाळा! 'इंद्रायणी' मालिकेत दहीहंडीचा उत्साह; इंदू फोडणार दहीहंडी

Indrayani: गोविंदा रे गोपाळा! 'इंद्रायणी' मालिकेत दहीहंडीचा उत्साह; इंदू फोडणार दहीहंडी

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 25, 2024 11:43 AM IST

Indrayani: सर्वांची लाडकी इंदू यंदा दहीहंडी फोडणार आहे. त्यामुळे चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

indrayani
indrayani

गो, गो, गो गोविंदा...! बाल गोपाळांचा आनंदाने बागडण्याचा दिवस म्हणजे 'गोपाळकाला.' सामान्य माणसांपासून ते आबालवृद्ध आणि कलाकारांपर्यंत सगळ्यांसाठीच दहीहंडीचा दिवस हा कल्ला करण्याचा असतो. ठिकठिकाणी दहीहंडी पाहायला मिळते. बाल गोपाळ ही दहीहंडी फोडतात. त्यांचा उत्साह द्विगुणी करण्यासाठी अनेक लोक येतात. आता 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'इंद्रायणी' या मालिकेतही दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. सर्वांची लाडकी इंदू यंदा दहीहंडी फोडणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरी 'इंद्रायणी' मालिकेत श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला विशेष भाग पार पडणार आहे. या भागात इंदू आणि व्यंकू महाराजांचे कृष्णजन्म विशेष कीर्तन पार पडणार आहे. इंदूने कीर्तन केलेले आनंदीबाई आणि विंझे यांना आवडत नाही. आता निरागस इंदूच्या प्रश्नांचे निरसन होणार का? हे मालिकेच्या आगामी भागांत प्रेक्षकांना कळेल.

इंदू आणि तिची फंट्या गँग जल्लोषात 'गोपाळकाला' साजरा करणार आहेत. विठुच्या वाडीत कीर्तन संपल्यानंतर होणाऱ्या दहीहंडीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. फंट्या गँग त्यांच्या पद्धतीने थर लावणार आहे. इंदू गोविंदा बनून दहीहंडी फोडणार आहे. एकंदरीतच 'इंद्रायणी' मालिकेच्या दहीहंडी विषेश भागात ड्रामा, जल्लोष असं सर्वकाही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या भागाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश

इंद्रायणी मालिकेत इंदू हे पात्र सांची साकारत आहे. तिने गोपाळकाला या भागाविषयी आनंद व्यक्त केला आहे. या विशेष भागाविषयी बोलतावा सांची म्हणते, ‘इंद्रायणी’ मालिकेच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदा मी दहीहंडी फोडली आहे. दहीहंडी फोडताना मला खरचं खूप मज्जा आली. सुरुवातीला मी घाबरले होते. पण नंतर मी मज्जा केली.”

विभाग