#Lai Aavdtes Tu Mala Update: '#लय आवडतेस तू मला' ही मालिका नुकताच सुरु झाली आहे. मालिका पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीली उतरताना दिसत आहे. आता मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील सरकार आणि सानिका हे योगायोगाने एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे हा देवीचा संकेत समजला जात आहेत. आता मालिरकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
कलर्स मराठी वाहिनीवर नुकताच सुरु झालेल्या '#लय आवडतेस तू मला' या मालिकेत थोडे वेगळे वळण आले आहे. मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सानिका पासून होते. तिचा हरवलेला अर्धा कडा मिळावा म्हणून मंदिरात देवीच्या चरणी प्रार्थना करताना दिसते. ती देवी आईला म्हणते, "जोपर्यंत मला माझा अर्धा कडा मिळत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही." या दृश्यात विशेष म्हणजे सानिका आणि सरकार एकाच वेळी प्रार्थना करत असताना त्यांच्यातील नात्याचा धागा दृढ होत असल्याचे दर्शवले जाते. मंदिरात त्याचवेळी त्यांच्या गळ्यात हार पडलेला आपल्याला दिसत आहे.
'#लय आवडतेस तू मला' दुसरीकडे सईने अप्पांना स्पष्ट सांगितले आहे की, "तिला सरकारसोबतच लग्न करायचे आहे आणि जर असे झाले नाही, तर ती आपला जीव देणार." हा नवा ट्विस्ट मालिकेत आता नवे वळण आणणार आहे. सरकार हा सानिकाच्या प्रेमात अखंड बुडाला आहे. त्याला सगळीकडे सानिका दिसत आहे. तसेच त्याच्या मनात तिच्याविषयी भावना आहेत. पण सईने देखील सरकारशी लग्न करण्याचा हट्ट केला आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
वाचा: बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी अभिनेत्रीने असे काही केले की पोलिसांनी केली अटक, वाचा काय झालं नेमकं?
कलर्स मराठीवरील '#लय आवडतेस तू मला' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच मालिकेने रसिकांची मने जिंकली असून, आता या मालिकेत एक नवा आणि रंजक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ही मालिका दररोज संध्याकाळी साडे नऊ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळत आहे. या मालिकेत सरकार आणि सानिका कधी एकत्र येणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. आता येत्या काळात काय होणार हे पाहण्यासाठी देखील उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या